महाराष्ट्राला लवकरच मिळणार एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट ! जानेवारी 2026 मध्ये सुरु होणार ‘हा’ महामार्ग

Published on -

Maharashtra New Expressway 2026 : मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. येत्या काही दिवसात 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सध्या या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. पण येत्या काही दिवसात या महामार्गाचा उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा भाग सुद्धा वाहतुकीसाठी सुरू होईल अशी आशा आहे.

याव्यतिरिक्त महाराष्ट्राला येत्या काही महिन्यांनी आणखी एका एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 मध्ये पूर्ण होईल असा दावा करण्यात आला असून त्यानंतर या मार्गावरून मुंबई ते गोवा दरम्यान चा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

खरे तर या महामार्ग प्रकल्पाचे काम मे 2025 पर्यंत पूर्ण करू अशी ग्वाही सरकारने दिली होती. परंतु आता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी या प्रकल्पाबाबत एक नवे अपडेट दिले आहे. त्यांनी हा प्रकल्प जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे.

आता त्याच्या प्रकल्पासाठी आता जानेवारी 2026 ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई-गोवा महामार्गातील पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या चौपदरीकरण कामाचा प्रारंभ 2011 मध्ये झाला. म्हणजेच या कामाला आता जवळपास 13 ते 14 वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे.

येत्या काही महिन्यांनी या कामाला दीड दशकांचा काळ पूर्ण होईल. मात्र तरीही या महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. सुरवातीच्या एक दोन नाही तर तब्बल दहा वर्ष चौपदरीकरण कामाची गती अत्‍यंत धीमी राहिली. त्‍यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये पळस्पे ते कासू या टप्प्याच्या कामासाठी नवा ठेकेदार नियुक्‍त करण्यात आला.

कासू ते इंदापूर या टप्प्याच्या कामासाठी जानेवारी 2023 मध्ये नवा ठेकेदार नियुक्‍त केला. आता या दोन्ही टप्प्यातील ठेकेदारांच्या माध्यमातून जोरदार काम सुरू आहे. पण, पळस्पे इंदापूरपर्यंत अनेक गावांतील ओव्हरब्रीज, तसेच इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.

त्‍यामुळे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्ता, तसेच माणगाव आणि इंदापूर शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामध्ये चाकरमान्यांना चार ते पाच तास नाहक अडकून पडावे लागत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते झाराप या कामाला 2013 साली प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर भूसंपादनातील अडथळे दूर होऊन 2017 मध्ये या टप्प्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.

यात झाराप ते लांजा हद्दीपर्यंत चौपदरीकरणाचे काम मे 2020 पर्यंत पूर्ण झाले; परंतु लांजा ते इंदापूर या दरम्‍यानच्या अनेक गावांमधील भूसंपादन, राजकीय हस्तक्षेप हे प्रश्‍न मार्गी काढण्यात राज्‍यकर्त्यांना अपयश आले. एकंदरीत गेल्या दीड दशकाच्या काळात महाराष्ट्रात वेगवेगळ्या पक्षांचे आणि विचारसरणीचे सरकार आले पण मुंबई गोवा महामार्गाचे कोडे कोणालाचं सोडवता आले नाही.

पण आता येत्या काही महिन्यांनी या महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. तरीही सध्या कामाची जी गती सुरू आहे तशीच गती कायम राहिली तर या प्रकल्पाच्या कामाला दोन वर्षे सुद्धा लागू शकतात असेही काही जाणकार सांगत आहेत. यामुळे आता खरंच या प्रकल्पाचे काम जानेवारी 2026 मध्ये पूर्ण होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe