जीव मारण्याची धमकी, पैशांची लूट आणि अत्याचार! तीन आरोपींनी विवाहित महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

Published on -

नगर तालुक्यातील देहरे गावात एका २९ वर्षीय विवाहित महिलेला धमकावून जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आरोपींनी महिलेला नगर-मनमाड महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिला अकोले येथे नेऊन तिच्याकडील पैसे आणि दागिने लुटून बसस्थानकावर सोडून दिले.

या प्रकरणी तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख (सर्व रा. देहरे, ता. नगर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ मार्च रोजी संध्याकाळी पीडित महिला आपल्या मुलासाठी जत्रेतून खेळणी आणण्याच्या कारणाने घराबाहेर पडली, मात्र त्यानंतर ती गायब झाली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अखेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही लोकांनी महिलेला तरुणांसोबत पाहिल्याचे सांगितले. गावातील नागरिकांनी शोध घेतल्यावर आरोपी एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले. त्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आणि १५ मार्च रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली. या सभेत गावातील वाढत्या अतिक्रमणांबाबत चर्चा झाली.

गावकऱ्यांनी गावात बाहेरून येणाऱ्या लोकांचे मूळ ठिकाण शोधण्याची आणि आधारकार्ड तपासण्याची मागणी केली. तसेच अवैध अतिक्रमणे तातडीने काढण्याचा ठराव करण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनीही या प्रकरणात लक्ष घालून गावात आंदोलनाचे संकेत दिले. १६ मार्च रोजी गावात बंद पाळण्यात आला.

१६ मार्चला एमआयडीसी पोलिसांनी अकोले पोलिसांच्या मदतीने बेपत्ता महिलेचा शोध घेतला. अकोले बसस्थानकाजवळ महिलेला सोडून दिल्यानंतर तिने एका महिलेच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना फोन केला. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.

पीडित महिलेची तक्रार आणि आरोप महिलेने दिलेल्या जबाबानुसार, आरोपींनी तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली जबरदस्तीने फोन करून बोलावून तिला वाहनात बसवून नेले नांदगाव शिवारातील हॉटेलमध्ये तन्वीर शेख याने तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला नगर, बेलापूर, संगमनेर, भंडारदरा परिसरात फिरवले १६ मार्चला अकोले बसस्थानकावर तिच्याकडील पैसे आणि दागिने काढून तिला तिथे सोडून दिले.

या घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिस लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करतील, अशी माहिती दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe