पत्नीची अदलाबदल करून अत्याचार ! अहिल्यानगर जिल्ह्यात लग्नाच्या नात्याला काळिमा

Published on -

श्रीरामपूरमध्ये एका पतीने स्वतःच्या पत्नीची अदलाबदल करून तिच्यावर अत्याचार घडवून आणल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात पतीसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह एका व्यक्तीस अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

पीडित महिलेचा विवाह २०१४ मध्ये झाला. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच पतीने तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण करून तिला त्रास दिला जात होता.

सुमारे दीड वर्षांपूर्वी पतीने तिला लोणी येथे एका अनोळखी व्यक्तीच्या बंगल्यावर नेले. तेथे त्या व्यक्तीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला धमकी दिली की, जर कुणाला काही सांगितले तर तिचे फोटो व्हायरल करेल.

यानंतर पतीने फेसबुकवर एका व्यक्तीशी मैत्री करून त्याला भेटायला बोलावले. त्या व्यक्तीसोबत एक महिला देखील होती. चारही जण शहरातील एका हॉटेलात गेले. तेथे पतीने पत्नीच्या आणि त्या अनोळखी पुरुष-महिलेच्या चहात गुंगीचे औषध मिसळले. त्या औषधामुळे त्यांना भुरळ पडली आणि शारीरिक संबंध झाले. दरम्यान, पतीनेही त्या पुरुषासोबत आलेल्या महिलेसोबत वेगळ्या खोलीत शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर काही दिवसांनी पतीने गंगापूर येथे त्या पुरुषाच्या घरी पत्नीला नेले. तेथे त्याने पत्नीला जबरदस्तीने सांगितले, “तू माझ्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेव, मी त्याच्या पत्नीसोबत राहतो”. मात्र, पीडित महिलेने त्यास नकार दिला.

पतीच्या या विकृत वर्तनाला कंटाळून अखेर पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत पतीसह लोणी येथील इसमाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील अन्य आरोपींना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe