१८ मार्च २०२५ आळेफाटा : काही खोडकर तरुणांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला त्यामुळे खवळलेल्या माश्यांनी केलेल्या हल्ल्यात शिवनेरी किल्ल्यावर आलेले ४७ पर्यटक जखमी झाले आहेत.काल तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी जमली होती.
पर्यटकांच्या हातातल्या मशालींच्या धुरामुळेही माश्या बिथरल्या.रविवारी सकाळी नऊ वाजता शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सदर घटना झाली.
खासदार नीलेश लंके प्रतिष्ठानकडून किल्ल्याच्या स्वच्छतेचे आयोजन केले होते.त्यासाठी लंके सुद्धा तेथे आले होते.तेव्हा त्यांना मधमाश्यांच्या हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालय गाठले आणि जखमींच्या आरोग्याची विचारपूस केली.

जखमी झालेले शिवभक्त मुंबईतील घाटकोपर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील नागरिक जास्त आहे.त्याशिवाय रत्नागिरी, रायगड, खडकवासला, धुळे, ठाणे या ठिकाणातील जखमींमध्ये समावेश आहे.रघुनाथ शेडगे हा लोणावळ्याचा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून सर्वांवर उपचार चालू आहेत.
घटनेनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि पुरातत्त्व विभागाचे गोकुळ दाभाडे पथकांसह जखमींच्या मदत करण्यासाठी पुढे आले.तोपर्यंत जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण, संकेत कबाडी, धीरज डोके, सुजल बिडवई, प्रथमेश कबाडी, संकेत बोंबले, मंगेश गव्हाणे, अनिकेत करवंदे, अकबर शेख यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.