Home Loan EMI Calculator : मुंबई पुणे नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर जळगाव यांसारख्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काचे घर घ्यायचे असेल आणि यासाठी जर तुम्ही कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. कारण की आज आम्ही होम लोन घेऊ इचणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे घर खरेदीचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर गृह कर्ज घ्यावेच लागते. फारच कमी लोक पूर्ण कॅश देऊन घर खरेदी करतात. नाहीतर अलीकडे बहुतांशी जनता होम लोन घेऊनच घराची खरेदी करत असते.

मात्र होम लोन घ्यायचे असेल तर मंजूर झालेल्या होम लोन साठी किती ईएमआय द्यावा लागणार? याची माहिती असल्यास महिन्याचं बजेट ऍडजेस्ट करणे सोयीचे होते. दरम्यान आज आपण होम लोनचा EMI कसा ठरतो? यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो? 50 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार? याच बाबतची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
कर्जाचा EMI ठरवण्याचा फॉर्मुला कोणता?
तुम्ही जर होम लोन घेणार असाल आणि तुम्ही घेतलेल्या कर्जासाठी किती रुपयांचा ईएमआय तुम्हाला भरावा लागणार? याबाबत कन्फ्युजन असेल तर तुम्ही एका सूत्राच्या मदतीने तुमच्या कर्जाचा ईएमआय पाहू शकता. EMI एका विशिष्ट सूत्राच्या माध्यमातून ठरत असतो.
EMI = [P x R x (1+R)^N] / [(1+R)^N-1] या सूत्राच्या माध्यमातून EMI ठरतो. इथं P म्हणजे मुद्दल, R म्हणजे महिन्याचा व्याजदर आणि N म्हणजे कर्जाचा कालावधी (महिन्यात). आता जर तुम्हाला महिन्याचा व्याजदर काढायचा असेल तर यासाठी वार्षिक व्याजदराचा 12 टक्क्याने भागाकार करावा लागणार आहे.
50 लाखाचे गृह कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ?
देशातील प्रमुख बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना साडेआठ टक्क्यांपासून ते 12 टक्के वार्षिक व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. होम लोन चा कालावधी हा साधारणता दहा ते 30 वर्षा दरम्यान असतो. पण बहुतांशी लोक हे वीस वर्ष परतफेड कालावधी सिलेक्ट करतात.
आता आपण जर एखाद्या ग्राहकाला 9% व्याजदराने 50 लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर वर सांगितलेल्या सूत्रानुसार त्याला किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार याबाबत माहिती पाहूयात.
EMI च्या सूत्रानुसार, [50,00,000 x 0.0075 x (1+0.0075)^240] / [(1+0.0075)^240-1] = 44,986 रुपये. अर्थातच, 50 लाखाचे होम लोन घेतल्यास संबंधित ग्राहकाला 44 हजार 986 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.