राज्यातील इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

सध्या 2024-25 शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी सुरू झाली आहे. विशेष बाब अशी की यंदा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Updated on -

Important News For Maharashtra Student : राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच त्यांच्या पालकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. खरंतर सध्या 2024-25 शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी सुरू झाली आहे.

शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जात असून यामुळे सध्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक सुद्धा गडबडीत आहेत. अशातच आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या फायनल एक्झाम बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या शाळकरी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा म्हणजेच फायनल परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे. विशेष बाब अशी की यंदा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या आधी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा टप्प्याटप्प्याने होत असे. पण आता सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून याबाबतचे आदेश सुद्धा जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे.

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. त्याची ‘डायट’ किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते. दरम्यान आता आपण इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कसं आहे वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा पुढल्या महिन्यात होतील. पाच एप्रिल ते 25 एप्रिल यादरम्यान या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत असं होतं की इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार घेत.

साधारणता एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत शाळांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असत. तसेचं, या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागल्यासारखीच स्थिती होती. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.

यावर्षी सर्वच शाळांच्या परीक्षा या एकाच वेळी होणार आहेत आणि पहिली ते नववीच्या परीक्षा सुद्धा सोबत घेतल्या जाणार आहेत. 5 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान सर्व वर्गांच्या परीक्षा होणार आहेत.

यामुळे आता विद्यार्थ्यांना जवळपास एप्रिल अखेर पर्यंत शाळेत यावे लागणार आहे आणि त्यानंतर एक मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर होणार आहे. परंतु एक मे रोजी निकाल जाहीर करण्यासाठी नक्कीच मुख्याध्यापकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe