पुणे, नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, 30 वर्षांपासून प्रलंबित ‘या’ रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या रूटमध्ये मोठा बदल, नवा रूट कसा राहणार?

पुणे ते नाशिक यादरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात आलेला नाही. यामुळे पुणे ते नाशिक असा प्रवास करायचा म्हटलं की अजूनही रस्ते मार्गाशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. अशातच आता या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

Published on -

Pune Nashik Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष खास आहे. खरे तर पुणे ते नाशिक यादरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात आलेला नाही.

यामुळे पुणे ते नाशिक असा प्रवास करायचा म्हटलं की अजूनही रस्ते मार्गाशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. पण भविष्यात आता पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार असून या दोन्ही शहरादरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे.

खरे तर हा रेल्वे मार्ग प्रकल्प 30 वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. अशातच आता या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या रूटमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कसा असणार नवा रूट?

खरंतर पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प ज्यावेळी प्रस्तावित करण्यात आला तेव्हा या रेल्वे मार्गाचा रूट नाशिक-संगमनेर-चाकण-पुणे असा निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून अखेरकार या प्रकल्पाला मंजुरी मिळाली.

मात्र, आता पूर्वीच्या या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेर मधून नाही तर शिर्डी आणि अहिल्यानगरमधून जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यामुळे हा निर्णय राजकीय हेतूने घेतला जात असल्याचा आरोप होत आहे. संगमनेरमधून नाशिक-पुणे रेल्वे मार्ग नेल्यास तो रेल्वे मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे. रेल्वे मार्गाने संगमनेर मधून पुणे कमी वेळेत गाठता येईल.

हा मार्ग संगमनेर मधून गेल्यास नाशिक ते पुणे दरम्यानचे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मात्र जर हा मार्ग शिर्डी मधून गेला तर या मार्गाचे अंतर वाढणार आहे. यामुळे हा प्रकल्प सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

वास्तविक, 1997 मध्ये रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी आणि खासदार वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर या मार्गात सातत्याने बदल होत राहिला.

त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला असून आता पुन्हा एकदा या रेल्वे मार्गाच्या रूटमध्ये बदल करण्यात आला असून त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe