Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील सह्याद्री रांगांतील डोंगर काळवंडले ! प्रचंड आगीने वन्यजीव मानवी वस्तीकडे निघाले, वनस्पती, पशुपक्षी खाक

Published on -

मागील काही दिवसांत आग, वणवा लागल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात डोंगरांना आग अर्थात वणवा लागला जात आहे. जंगलांना आग लागत आहे. अर्थात हा वणवा किंवा आग ही मानवनिर्मित असल्याचे नेहमीच बोलले जाते. जास्त नुकसान हे सह्याद्री पर्वत रांगांचे होताना दिसतेय. सह्याद्री पर्वत रांगातील डोंगर, दऱ्यांच्या कुशीत संगमनेर-अकोले तालुक्याचा पठार भाग वसला आहे. हे डोंगर मानव निर्मित वणव्यांमुळे काळवंडू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वनव्याच्या मालिकेने वन्यजीवांसह होरपळणारे वृक्षांकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे.

पठार भागातील साकुर, वरुडी, रणखांब, पिंपळगाव देपा, सावरगाव घुले, डोळासने, बोटा, घारगाव, अकलापूर, बेलापूर, आंबी दुमाला, म्हसवंडी, जाचकवाडी, ब्राम्हणवाडा, बदगी, बोरबन, कोठे बुद्रुक, वनकुटे, भोजदरी, आंबी, नांदूर, जांबुत, खालसा या परिसरातील डोंगरांवर बिडी सिगारेटचे झुरके घेणाऱ्यांमुळे मानवनिर्मित वनवे पहायला मिळत आहे.

डोंगरावरील गवत आता जाळल्यास पावसाळ्यात चांगले येईल, या गैरसमजातून वणवे लावले जात असल्याची चर्चा आहे. यात वनविभागाने लाखो रुपये खर्चुन वृक्ष संवर्धनासाठी केलेले प्रयत्न पाण्यात जात आहे. जानेवारी ते जून महिन्या दरम्यान रोज कोणत्या एका डोंगराला आग लागत आहे. यांमध्ये वृक्ष, औषधी वनस्पती, वनसंपदा नष्ट होत चालली आहे. यात पशु पक्षी प्राणी यांचा होरपळून मृत्यू होताना दिसत आहे.

वन्यजीव वळले मानवी वस्तीकडे

डोंगराला लागलेल्या आगीत वन्यजीवांचे अन्न, पाणी, निवारा संपुष्टात आल्याने किडे, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, रानडुक्कर, माकड, मोर, कोल्हे, लांडगे, हरिण, तरस, बिबटे, वाघ मानवी वस्तीकडे वळत आहेत. शेतातील पिके, बाजरी, मका, गवत, ऊस, ओढे, नदी येथे आपले वास्तव्य करताना आढळतात. त्यातूनच बिबट्या सारख्या नरभक्षकाकडून मानवावर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe