मुंबई-पुणे Expressway ने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 एप्रिलपासून…..

तुम्हीही मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक धक्का बसणार असून आता आपण एक एप्रिल पासून वाहनधारकांना किती टोल भरावा लागणार याची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Mumbai Pune Expressway News : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. मुंबई पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणापैकी मुंबई ते पुणे या मार्गावर दररोज असंख्य लोक प्रवास करतात. मुंबई ते पुणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.

दरम्यान जर तुम्हीही मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एक एप्रिल 2025 पासून अधिकचा टोल द्यावा लागणार आहे.

यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक धक्का बसणार असून आता आपण एक एप्रिल पासून वाहनधारकांना किती टोल भरावा लागणार याची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती वाढणार टोलचे दर?

मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक एप्रिल पासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या एक्सप्रेस वे वरील टोलच्या रेट मध्ये तब्बल तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक एप्रिल 2025 पासून मुंबई -पुणे एक्सप्रेस या राज्यातील पहिल्या प्रवेश नियंत्रित महामार्गावरुन प्रवास करताना चारचाकी वाहनांना एकेरी प्रवासासाठी म्हणजेच एका दिशेने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत.

तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा दोन्ही दिशेने प्रवास करायचा असल्यास 10 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. तसेच इतर श्रेणींतील वाहनांसाठी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

एकंदरीत टोलचा रेटमध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय आता फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. जर समजा तुमच्या गाडीला फास्टटॅग नसेल तर तुम्हाला आता डबलचा टोल भरावा लागणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला असून ज्या गाड्यांवर फास्टटॅग नसेल त्यांना डबल चे पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे.

एकंदरीत एक एप्रिल 2025 पासून राज्यातील वाहनधारकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता टोल दरवाढीचा सुद्धा सामना करावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe