Ahilyanagar : गुंगीच औषध पाजायचे, नंतर पत्नींची अदलाबदल करायचे.., अनेकांशी संबंध; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर

Published on -

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. यात महिलांचे अपहरण, अत्याचार आदी घटनांचा समावेश आहे. आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात पत्नीला गुंगीचे औषध देऊन परपुरुषाशी संबंध ठेवायला देणाऱ्या पतीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोणी येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पीडित महिलेने (वय २९) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१४ मध्ये महिलेने आपला विवाह झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चार महिने चांगले वागविल्यानंतर पतीने मारहाण व शिवीगाळ सुरू केली. सासू व सासरे यांनीही वाईट वागणूक दिली. दीड वर्षापूर्वी आपल्याला लोणी येथे नेण्यात आले. तेथे एका बंगल्यावर एक अनोळखी व्यक्ती होती. ती शरीराने धडधाकट उंच, रंगाने काळीसावळी होती.

त्या अनोळखी व्यक्तीने आपल्याशी बळजबरीने शरीरसंबंध केले. त्याची वाच्यता केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार भुलीच्या गोळ्या देऊन करण्यात आला. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे एका दुकानाच्या पाठीमागे मला नेले, तीथे एक व्यक्ती होती. पतीने नकळत मला व त्या जोडप्याला दिलेल्या चहात औषध टाकले होते. तीन ते चारमहिन्यापूर्वी त्याच व्यक्तीच्या घरी छत्रपती संभाजीनगर येथे नेवून तसाच प्रकार करण्यास सांगितले. मात्र मी त्यास नकार दिला, असे त्या महिलेने म्हटले आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी पतीने श्रीरामपुरातील एका लॉजवर नेऊन गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून आलेल्या एका पती व पत्नीबरोबर अदलाबदली करून शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. त्यापूर्वीही पतीने नकळत आपल्याला चहामध्ये औषध पाजले. संबंधित व्यक्तीच्या छत्रपती संभाजीनगर येथील बंगल्यावरही असा प्रकार करण्यात आला.
एकूणच या गंभीर घटनेमुळे श्रीरामपुरात एकच खळबळ उडाली असून विविध स्तरातून निषेध होत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe