होळी झाली तरी महागाई भत्ता (DA) वाढला नाही, आता कधी मिळणार DA वाढ ? समोर आली मोठी अपडेट

दरवर्षी मार्च महिन्यात, होळी सणाच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. मात्र अजून याबाबतचा निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए म्हणजे महागाई भत्ता आणि डीआर म्हणजे महागाई सवलत भत्ता वाढविण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

Published on -

DA Hike : देशातील जनतेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी होळीचा मोठा सण साजरा केला. राज्यातही होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळाली. येत्या काही दिवसांनी देशात गुढीपाडव्याचा देखील सण सेलिब्रेट होणार आहे. मात्र, अजूनही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून ची महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली नाही.

दरवर्षी मार्च महिन्यात, होळी सणाच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. यावेळी देखील होळीच्या आधीच महागाई भत्ता वाढणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. मात्र अजून याबाबतचा निर्णय झालेला नाही.

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए म्हणजे महागाई भत्ता आणि डीआर म्हणजे महागाई सवलत भत्ता वाढविण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. साहजिकच यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

डीए वाढविण्याच्या निर्णयास सुमारे एका आठवड्यात उशीर झाला आहे. खरंतर 19 मार्च 2025 रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असे म्हटले जात होते.

मात्र प्रत्यक्षात असे काही घडले नाही. पण आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात केंद्रातील सरकारच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतच्या प्रस्तावावर शिकामोर्तब होऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचे बैठक होईल आणि त्यात महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. मात्र प्रत्यक्षात सरकारकडून या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही यामुळे पुढल्या आठवड्यात खरंच याबाबतचा निर्णय होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

खरे तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये यावेळी किती वाढ होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहेत. महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते.

एआयसीपीआयची जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील आकडेवारी जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता ठरवणार आहे. दरम्यान या आकडेवारीवर जर नजर टाकली तर यावेळी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त दोन ते तीन टक्क्यांनी वाढेल असे दिसते.

जर समजा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला तर गेल्या सात वर्षांतील ही सर्वात कमी महागाई भत्ता वाढ राहणार आहे. गेल्या वेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता.

त्यामुळे आता महागाई भत्ता नेमका दोन टक्क्यांनी वाढणार किती टक्क्यांनी हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय जानेवारी 2025 पासूनच लागू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe