Ahilyanagar Breaking : माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला; गंभीर जखमी,हजारो समर्थक हॉस्पिटलबाहेर..

Published on -

अहिल्यानगरमधून एक मोठे वृत्त आले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला झालाय. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहे.

त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सूरु आहेत.काल बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण तेथे आले. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला.परंतू त्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला.याबाबतची माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन गंभीर जखमी केले आहे.

घटनास्थळावरून कदम यांना डॉ. दादासाहेब शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर जखम असल्याने नगराध्यक्ष कदम यांना तातडीने राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

माजी आ.चंद्रशेखर कदम, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांसह राजकीय व सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता हल्ला करणाऱ्या तरुणांना तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलविण्यास सांगितले. त्यानुसार अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात कदम यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटने नंतर माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या बागायतपीक सोसायटी समोर मोठा जनसमुदाय जमला होता. शहरात बाबुराव पाटील यात्रा सुरु असल्याने कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. आम्ही कोणाच्या शेपटावर पाय देत नाही. आमच्या शेपटावर कोणी पाय दिल्यास सोडत नाही.असा स्पष्ट इशारा माजी आ.कदम यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News