Zodiac Sign 2025 : राशीचक्रातील 12 पैकी तीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस विशेष खास ठरणार आहे. उद्या 29 मार्च पासून काही राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होईल आणि त्यांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. कारण की शनी ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनी ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते.

दरम्यान 29 मार्च रोजी शनी ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनि ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कर्क, तूळा आणि मकर राशीच्या व्यक्तींना सकारात्मक फळ मिळणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश चला जाणून घेऊयात.
कर्क : या राशीच्या व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आरोग्य उत्तम राहील आणि सामाजिक वर्चस्व वाढेल. व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक लाभ संभवतात.
म्हणजेच शैक्षणिक व्यावसायिक आणि करिअरवाईज हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचा राहणार आहे. 29 मार्चपासून या राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होईल असे दिसते.
तूळा : कर्क राशींप्रमाणेच या राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची पूर्ण साथ मिळेल. 29 मार्च पासून तुला राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहेत. या राशीच्या लोकांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल, नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. या काळात या लोकांची पैशांची चणचण पूर्णपणे दूर होईल.
करिअरमध्ये प्रगती होईल आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा काळ या राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.
मकर : या राशीच्या व्यक्तींना तुळा आणि कर्क राशीच्या व्यक्ती प्रमाणेच चांगले आर्थिक लाभ होतील असे दिसते. या लोकांचा सुवर्णकाळ आता सुरू होणार आहे. 29 मार्चपासून मकर राशीच्या लोकांचा वाईट काळ पूर्णपणे समाप्त होणार आहे.
या काळात या लोकांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन कामांना सुरुवात होईल, तसेच अडथळे दूर होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश प्राप्त होईल आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी दिलेले लक्ष्य पूर्ण करता येईल, वरिष्ठांची मर्जी संपादन होईल आणि कौटुंबिक आनंद सुद्धा लाभेल.