FD करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना बनवणार मालामाल, ग्राहकांना मिळणार 7.90% पर्यंतचे व्याज

बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्पेशल एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना तब्बल 7.95% पर्यंतचे व्याज दिले जात आहे.

Published on -

FD News : सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत आणि या काळात तर एफडी करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक वाढली आहे.

बँका देखील एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. दरम्यान जर तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण एका सरकारी बँकेच्या विशेष एफ डी योजनेची माहिती पाहणार आहोत.

खरेतर देशभरातील विविध बँका आणि एनबीएफसी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष एफडी योजना देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 400 दिवसांची आणि 444 दिवसांची स्पेशल एफडी योजना उपलब्ध करून देत आहे.

ज्यामध्ये नियमित निश्चित ठेवींच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक परतावा मिळतो. या यादीमध्ये एसबीआय सारख्याच बर्‍याच सरकारी आणि खाजगी बँकांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदा सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष एफडी योजना चालवत आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जवळपास आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जात आहे.

कशी आहे बँक ऑफ बडोदाची स्पेशल FD योजना

बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून बी ओ बी उत्सव डिपॉझिट स्कीम योजना सुरू करण्यात आली आहे. ही स्पेशल एफबी स्कीम चारशे दिवसांची असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थात 60 वर्षांवरील नागरिकांना लागू असणारे व्याज दर भिन्न आहेत.

म्हणजे यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून अधिक परतावा दिला जात आहे. यात दोन्ही कॉलेबल आणि नॉन-कॉलेबल पर्याय उपलब्ध आहेत. यात गुंतवणूकीची मर्यादा जास्तीत जास्त 3 कोटी रुपये आहे.

वैयक्तिक आणि संयुक्त खातेदार याचा फायदा घेऊ शकतात. यात गुंतवणूक करायची असेल तर ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध आहे. ग्राहक बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन एफडीसाठी खाते उघडू शकतात.

या चारशे दिवसांच्या स्पेशल एफबी स्कीम मध्ये गुंतवणूक करणारा सामान्य ग्राहकांना 7.30% सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.80% आणि सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.90% दराने परतावा दिला जात आहे.

नॉन कॉलेबल एफडीचा ऑप्शन निवडल्यास सामान्य नागरिकांना 7.35%, ज्येष्ठ नागरिकांना 7.85% आणि सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.95% दराने व्याज दिले जात आहे.

बँकेने ऑक्टोबर 2024 मध्ये ही स्पेशल FD स्कीम सुरू केली होती. या योजनेत आत्तापर्यंत अनेकांनी गुंतवणूक केली असून येत्या काही दिवसांनी यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe