अशोकभाऊ फिरोदिया शैक्षणिक क्षेत्रातील राजहंस :- भुषण भंडारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगन्य असणाऱ्या अ.ए.सो.चे भुतपुर्व प्रमुख कार्यवाह अशोकभाऊ फिरोदिया यांचा स्मृतीदिन इचरजबाई फिरोदिया प्रशालेत साजरा करुन अभिवादन करण्यात आला.

अ.ए.सो.शैक्षणिक संस्थेचे भुतपूर्व कार्यवाह अशोकभाऊ फिरोदिया यांचे कार्य महाराष्ट्रभर परिचित आहे .त्यांच्या कार्यांत शैक्षणिक क्षेत्रातील बदल हे विद्यार्थी विकास आणि भविष्यात होणाऱ्या विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते,

संगणक शिक्षण ,सेमी इंग्रजी शिक्षण ,विद्यार्थी समावेशित बदल या सर्व गोष्टी साठी निर्णय महत्त्वाचे राहिले. या प्रसंगी प्रशालेत स्मृतीदिन साजरा केला या प्रसंगी शाळा समिती सदस्य भुषण भंडारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

आणि स्व.अशोकभाऊ फिरोदिया शैक्षणिक क्षेत्रातील राजहंस होते त्यांच्या कार्यांची प्रेरणा घेऊनच सर्व कार्य करत आहे असे मत व्यक्त केले, या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कदम यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा तसेच अशोकभाऊनी केलेले

शैक्षणिक नियोजन बदल उद्यापही टिकून आहे.आणि यापुढेही अशाच पध्दतीने शैक्षणिक विकासासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत असे मत व्यक्ती केले. या प्रसंगी पूर्वप्राथमिक इनचार्ज सोनवणे मिनाक्षी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment