Punjab National Bank Home Loan : आपल्या आवडत्या ठिकाणी, मनपसंत प्राईम लोकेशनवर घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अलीकडे तर घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्वप्नातील घरासाठी आता लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि अनेकांसाठी आयुष्यभराची कमाईही कमी पडते.
त्यामुळे अनेक लोक बँकांकडून गृहकर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. आतापर्यंत अनेकांनी गृह कर्ज घेऊन आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

खरेतर गृहकर्ज घेतल्यावर घराची किंमत हळूहळू हप्त्यांद्वारे फेडावी लागते, मात्र त्यासाठी मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. यामुळे कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँकांकडून कर्ज घेणे अधिक फायद्याचे ठरते. कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँकांबाबत बोलायचं झालं तर पंजाब नॅशनल बँक देखील यामध्ये समाविष्ट आहे.
अशा परिस्थितीत आता आपण पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाख रुपयांचे गृह कर्ज 30 वर्षांसाठी घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेचे व्याजदर
पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदरावर गृहकर्ज उपलब्ध करून देते. या बँकेकडून सध्या स्थितीला 8.15 टक्के वार्षिक व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून दिले जात आहे, मात्र हा दर अर्जदाराच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असतो.
आरबीआयने रेपोरेट मध्ये कपात केल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे हे नवीन व्याजदर लागू झालेले आहेत. मात्र या व्याजदराचा फायदा फक्त अशाच ग्राहकांना मिळतो ज्यांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो.
दरम्यान, जर पंजाब नॅशनल बँकेकडून एखाद्या ग्राहकाला 40 लाख रुपयांचे गृहकर्ज 30 वर्षांसाठी 8.15 टक्के व्याजदराने मंजूर झाले तर त्याला सुमारे 29,770 रुपये हप्ता भरावा लागेल.
अशा प्रकारे, 30 वर्षांत बँकेला एकूण 1.07 कोटी रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये 67.17 लाख रुपये केवळ व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. यामुळे गृहकर्ज घेताना व्याजदराचा नीट अभ्यास करून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
म्हणून कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांच्या योजनांची तुलना करणे आणि आर्थिक नियोजन करूनच पुढे जाणे चांगले राहणार आहे. एकंदरीत पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर हा देशातील इतर बँकांच्या तुलनेत कमी आहे आणि या बँकेकडून होम लोन घेतल्यास ग्राहकांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे.