Mumbai Goa Railway News : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य आणि कोकण रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी पाहता समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन दरम्यान ही समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून या समर स्पेशल ट्रेनमुळे मुंबई ते गोवा दरम्यान चा प्रवास अधिक सोयीचा होईल अशी आशा आहे.

अशा परिस्थितीत आज आपण लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक?
मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन गाडी (क्रमांक ०११०४/०११०३) साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालवली जाणार आहे. रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११०४ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ४ मे २०२५ पर्यंत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून निघेल आणि ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तसेच, गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे रात्री ९.४० वाजता पोहोचणार आहे.
कोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वेगाडीला करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड,
विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबा मंजूर झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.