Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ; कोल्हापुरातून सुरु होणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस ट्रेनला अहिल्यानगर मध्ये थांबा !

कोल्हापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कोल्हापूर ते कटिहार दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबणार आहे. या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

Published on -

Ahilyanagar Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते कटिहार दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून या ट्रेनचा पश्चिम महाराष्ट्रातून बिहारला आणि बिहार मधून पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

ही गाडी अहिल्यानगर मध्ये देखील थांबणार आहे, यामुळे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना देखील या गाडीचा फायदा होणार आहे. दरम्यान आज आपण याच समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार? याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक

मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-कटिहार समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01405) कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून 6 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी बिहारमधील कटिहारकडे रवाना होणार आहे अन ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कटिहारला पोहोचणार आहे.

कटिहार कोल्हापूर समर स्पेशल (गाडी क्रमांक 01406) ट्रेन 8 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी कटिहार रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर कटिहार समर स्पेशल ट्रेन अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबणार आहे. या स्पेशल ट्रेनला या मार्गावरील मिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,

भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया आणि नौगचिया या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

या ट्रेनमुळे पश्चिम महाराष्ट्रात जे बिहारी लोक कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत त्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावाकडे परतताना मोठा फायदा होईल अशी आशा या निमित्ताने प्रवासी संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच बिहार मधून पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी देखील ही ट्रेन मोठी फायद्याची राहणार आहे. या ट्रेनचा कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, अहिल्यानगर यांसारख्या अनेक जिल्ह्यांमधील जनतेला देखील मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News