Maruti Eeco Offer | भारतात सर्वाधिक मागणी असणाऱ्या 7-सीटर कारपैकी एक म्हणजे मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco). ही कार केवळ किफायतशीर नाही, तर तिचं मायलेजही इतरांपेक्षा जास्त आहे. सध्या कंपनीने एप्रिल महिन्यात या कारवर तब्बल 3500 पर्यंत सवलत जाहीर केली आहे, जी केवळ 30 एप्रिल 2025 पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे जे ग्राहक कार खरेदीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
कितीपर्यंत सूट मिळणार?
या सवलतीमध्ये 10000 पर्यंत रोख सूट आणि 25000 पर्यंत स्क्रॅपपेज बोनसचा समावेश आहे. सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 5.44 लाख ते 6.70 लाखांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे, कंपनी या महिन्यानंतर कारच्या किंमतीत 62000 पर्यंत वाढ करू शकते, त्यामुळे लवकर खरेदी करणं अधिक फायदेशीर ठरेल.

मारुती इकोमध्ये K-Series 1.2 लिटर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन पेट्रोलवर 80.76PS पॉवर आणि 104.5Nm टॉर्क जनरेट करतं. CNG वर चालवताना, ते 71.65PS पॉवर आणि 95Nm टॉर्क तयार करतं. मायलेजच्या बाबतीत ही कार देखील मागे नाही. टूर व्हेरिएंटमध्ये पेट्रोलसाठी 20.2किमी/लीटर आणि CNG साठी तब्बल 27.05 किमी/किलो मायलेज मिळतं, तर प्रवासी व्हेरिएंटमध्ये ते अनुक्रमे 19.7 किमी आणि 26.78 किमी आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
सुरक्षेच्या दृष्टीने, इकोमध्ये 11 महत्त्वपूर्ण फीचर्स आहेत. यामध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर, इंजिन इमोबिलायझर, चाइल्ड लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, ABS + EBD आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग्जचा समावेश आहे. आताच्या मॉडेलमध्ये कंपनीने नवीन स्टीअरिंग व्हील आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे, जे S-Presso आणि Celerio या मॉडेल्समधून घेतलं आहे.
डिझाइन आणि व्हेरिएंट्सबाबत बोलायचं झालं, तर ही कार 5-सीटर, 7-सीटर, टूर, कार्गो आणि अॅम्ब्युलन्स अशा एकूण 5 बॉडी स्टाईल्समध्ये येते. यामध्ये 5-सीटर व्हेरिएंटची किंमत 5.32 लाख ते 6.58 लाख दरम्यान आहे, तर 7-सीटर व्हेरिएंटची किंमत 5.61 लाख आहे. कारची लांबी 3,675 मिमी, रुंदी 1,475 मिमी आणि उंची 1,825 मिमी आहे, तर अॅम्ब्युलन्स व्हेरिएंटची उंची 1,930 मिमी आहे.
या किमतीत इतकी जागा, मायलेज, आणि फीचर्स देणारी दुसरी कोणतीही 7-सीटर कार सध्या भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे कमी बजेटमध्ये मोठा परिवार असलेल्या ग्राहकांसाठी ही कार एक परिपूर्ण पर्याय ठरू शकतो.