मोटोरोलाचा नवा फोन लाँचपूर्वीच चर्चेत, फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Motorola Edge 60 हा नवा फोन लाँचपूर्वीच चर्चेत प्रचंड आला आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 512GB स्टोरेज, 68W फास्ट चार्जिंग आणि IP69 वॉटरप्रूफ रेटिंगसह प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत.

Updated on -

Motorola Edge 60 | मोटोरोला आपल्या लोकप्रिय Edge मालिकेतील नवा स्मार्टफोन Motorola Edge 60 घेऊन येण्याच्या तयारीत आहे. या फोनबाबत लाँचपूर्वीच अनेक माहिती लीक झाल्या असून, त्याच्या डिझाईनपासून ते खास फीचर्सपर्यंतचे तपशील समोर आले आहेत.

या डिव्हाइसमध्ये 512GB पर्यंत स्टोरेज, दमदार चार्जिंग सपोर्ट, प्रीमियम डिझाइन आणि शानदार कॅमेरा मिळणार आहे. कंपनीकडून अद्याप लाँच तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी लीक माहितीमुळे याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

फीचर्स 

Motorola Edge 60 मध्ये MediaTek Dimensity 7400 चा प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. हा फोन 8GB किंवा 12GB LPDDR4x RAM आणि 256GB किंवा 512GB स्टोरेजसह बाजारात येण्याची शक्यता आहे.

यामध्ये Android 15 बेस्ड Hello UI सिस्टीम मिळणार असून, तीन वर्षांचे Android अपडेट्स आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा क्वाड कर्व्ह डिस्प्ले असणार असून, Gorilla Glass 7i प्रोटेक्शन आणि अ‍ॅक्वाटच टेक्नोलॉजीसह मिळेल. यात मध्यभागी होल-पंच कटआउटसह फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.

यामध्ये 50MP Sony LYT700C प्रायमरी सेन्सर, 13MP अल्ट्रा वाइड शूटर आणि एक 3-in-1 लाईट सेन्सर मिळू शकतो. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याशिवाय, Moto AI Suite फीचरमुळे फोटो आणि व्हिडिओ अनुभव आणखी आकर्षक होण्याची शक्यता आहे.

चार्जिंग

चार्जिंगबाबत बोलायचे झाल्यास, Motorola Edge 60 मध्ये 5,500mAh बॅटरी आणि 68W वायर्ड टर्बो फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. डिव्हाईस IP68 आणि IP69 रेटिंगसह येणार असून, धूळ व पाण्यापासून पूर्णतः सुरक्षित असेल.

तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा पर्यायही यात देण्यात आलेला आहे. डिझाइनबाबत लीक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, फोन 3D सिलिकॉन व्हेगन लेदर फिनिशसह येईल आणि दोन आकर्षक रंगांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे – निळा आणि हिरवा. Motorola Edge 60 लाँच झाल्यानंतर मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये नक्कीच मोठी स्पर्धा निर्माण होईल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News