इंस्टाग्राम यूजर्ससाठी गुड न्यूज, रील्स आता ऑडिओसह WhatsApp वर शेअर करता येणार!

इंस्टाग्रामच्या नवीन अपडेटमुळे आता वापरकर्त्यांना रील्स WhatsApp स्टेटसवर थेट ऑडिओसह शेअर करता येणार आहे. या नवीन अपडेटबद्दल सविस्तर जाणून घेऊयात-

Published on -

Instagram Reels | इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक उपयुक्त आणि आनंददायक अपडेट समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील व्हिडिओ शेअरिंगचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी आता इंस्टाग्रामने एक नवीन फीचर सुरू केले आहे, ज्यामुळे वापरकर्ते इंस्टाग्रामवरील रील्स थेट WhatsApp स्टेटसवर शेअर करू शकतात.

विशेष म्हणजे, या रील्सचा ऑडिओही स्टेटसवर दिसेल व ऐकू येईल, जो याआधीच्या शेअरिंगमध्ये अनेकदा गायब होत असे.

कसं असणार नवीन अपडेट?

पूर्वी वापरकर्ते इंस्टाग्राम रील्स डाउनलोड करून किंवा थेट शेअर करून WhatsApp स्टेटसवर टाकत असत, तेव्हा व्हिडिओ तर दिसायचा पण त्याचा आवाज ऐकू येत नसे. यामुळे अनेक युजर्स आणि कंटेंट क्रिएटर्स निराश होत असत. परंतु, आता ही समस्या दूर झाली आहे आणि वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.

हे नवीन फीचर वापरणेही अगदी सोपे आहे. युजर्सना फक्त इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये जाऊन हवी असलेली रील उघडावी लागेल. त्यानंतर त्या रीलखाली असलेल्या ‘शेअर’ आयकॉनवर टॅप करून, ‘WhatsApp’ आणि ‘WhatsApp Status’ हे पर्याय निवडले की ती रील थेट स्टेटसवर पोस्ट करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेदरम्यान रीलचा मूळ ऑडिओही कायम राहतो.

कंटेंट क्रिएटर्सला मोठा फायदा-

हे अपडेट विशेषतः कंटेंट क्रिएटर्ससाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आता त्यांना त्यांच्या तयार केलेल्या व्हिडिओंसाठी एडिटिंग, ट्रान्सकोडिंग किंवा डाउनलोडिंग यासारखी प्रक्रिया न करता थेट रील्स WhatsApp वर शेअर करता येणार आहेत. त्यामुळे वेळ आणि मेहनत वाचणार असून, त्यांचा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो.

एकंदरीत, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपमधील हे इंटरप्लॅटफॉर्म फीचर सोशल मीडिया वापराचा अनुभव अधिक सुलभ, वेगवान आणि आकर्षक बनवेल. यामुळे खास करून तरुण वापरकर्त्यांना आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तींना अधिक पोहोच मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe