अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाच्या अशा साईमिडास हा व्यावसायिक प्रकल्प कायमचा बंद होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे वीज मीटर आणि पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ तोडण्यात यावे असे आदेश त्या त्या खात्याना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रमुख एल. एस. भांड यांनी दिले आहेत .
नगर मनमाड महामार्गावर दूध संघाच्या जागेमध्ये बेकायदेशीर रित्या साई मिडास ही व्यवयसायिक इमारत उभारण्यात आली आहे . या संदर्भामध्ये माजी महापौर दीप चव्हाण यांनी येथील ज्येष्ठ विधिन्य अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत त्यांनी सुरुवातीला नगर महानगर पालिका , आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच हरित लवाद या ठिकाणी तक्रार दाखल केली होती

साई मिडास बांधताना महानगरपालिकेमध्ये यांनी विकास भार सुद्धा भरलेल्या नव्हता ही बाब अत्यंत महत्त्वाची होती दीप चव्हाण यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित एजन्सीने महानगर पालिकेकडे त्यावेळेला सुमारे सात कोटी रुपये विकास भागाचे भरले होते त्यामुळे पालिकेचे नुकसान टळले होते.
बांधकाम थांबवण्याचे आदेश
नगर-मनमाड महामार्गावरील जिल्हा दूध संघाच्या जागेत साई मिडासच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या इमारत बांधकाम प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाची परवानगी न घेतल्याने हे बांधकाम थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. विशिष्ट मर्यादे पेक्षा अधिक मोठे बांधकाम असेल तर हरित लवाद आयोग व प्रदूषण नियंत्रण मंडळाची रितसर परवानगी घ्यावी लागते.
ती घेतली गेली नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन तपासणी केली. त्यानंतर बांधकाम थांबवण्याचे य निर्देश प्रादेशिक अधिकारी वि एल. एस. भांड यांनी दिले होते.
जागेचा वापर गैरमार्गाने
यावेळी प्रदूषण महामंडळाकडे लेखी मुद्दे मांडताना वकील पुप्पाल यांनी सदर जागेचा वापर हा गैर मार्गाने करण्यात आलेला आहे तसेच कोणत्याही प्रकारे योग्य अशी परवानगी न घेता कोणत्या प्रकारचे नियमाचे पालन संबंधिताने केलेले नाही ही बाब त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केलेली होती.
त्यानंतर प्रदूषण मंडळाने संबंधित साई मिडास याला दिलेले विजेचे कनेक्शन हे २४ तासाच्या तोडावे तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी या बिल्डिंग साठी देण्यात आलेले पाण्याचे कनेक्शन हे सुद्धा तोडावे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्याबाबतच्या आदेश येथील प्रशासनाला प्राप्त झालेले आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये अनिमियता
दरम्यान साई मिडास या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनिमियता झाली असल्याचा प्रकार दीप चव्हाण यांनी उघड केलेला होता व त्यानंतर येथील महानगरपालिका प्रशासनाकडे त्यांनी या प्रकरणाकडे लिखित तक्रार सुद्धा या अगोदर दाखल केलेली आहे व त्याची पुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे.
तत्पूर्वी या बिल्डिंग साठी जे काही नियम व अटी होत्या त्याचे उल्लंघन झाले ते दिसून आले म्हणून प्रदूषण महामंडळाकडे दाखल झालेल्या प्रकरणावर आता हा निर्णय झाल्यामुळे प्रशासनाला आता ही कारवाई तात्काळ करावी लागणार आहे.