UPSC Preparation | UPSC परीक्षेची तयारी करताना महागडी कोचिंग, पुस्तके, नोट्स आणि मॉक टेस्ट यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. पण आता अनेक शासकीय, डिजिटल आणि सोशल माध्यमांमुळे ही तयारी अगदी कमी खर्चात किंवा पूर्णतः मोफत करता येते. येथे UPSC तयारीसाठी मोफत पुस्तके आणि अभ्यास साहित्य मिळविण्याचे 7 सोपे मार्ग सांगितले आहेत, जे प्रत्येक विद्यार्थ्याने नक्की वापरले पाहिजेत.
1. ncert.nic.in
6 वी ते 12 वीपर्यंत सर्व विषयांची PDF पुस्तके तुम्हाला येथे मोफत उपलब्ध आहेत. ही पुस्तके UPSC पूर्व व मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक आहेत.

2. epathshala.nic.in
येथे NCERT पुस्तके, ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स आणि डिजिटल पुस्तकांचे वाचन करता येते. हे सरकारचे अधिकृत प्लॅटफॉर्म आहे.
3. फ्री अॅप्स वापरा
Testbook, BYJU’s, Unacademy आणि Khan Academy यांसारख्या अॅप्सवर फ्री मॉक टेस्ट, लेक्चर्स आणि नोट्स उपलब्ध आहेत. त्यांचे मोफत व्हर्जन उपयोगी ठरते.
4. शासकीय ग्रंथालय
शहरातील शासकीय ग्रंथालयांमध्ये UPSC विषयक पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ID आणि अॅड्रेस प्रूफसह सभासदत्व घ्या आणि याचा लाभ घ्या.
5. Kindle Reading App
मोबाईलवर Kindle App डाउनलोड करा. “Free UPSC Books” शोधा. अनेक जनरल नॉलेज व अभ्यास उपयोगी पुस्तके इथे तुम्हाला मोफत मिळतील.
6. सोशल मीडिया ग्रुप्स
Telegram, WhatsApp, Facebook वर UPSC स्टडी ग्रुप्समध्ये मोफत नोट्स, सराव प्रश्न आणि चालू घडामोडी उपलब्ध असतात. Vision IAS, UPSC Adda हे काही लोकप्रिय ग्रुप आहेत.
7. शासकीय मोफत कोचिंग योजना
SC, ST, OBC आणि EWS वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार UPSC कोचिंग मोफत देते. त्यामध्ये अभ्यास साहित्य आणि हॉस्टेलची सुविधाही दिली जाते. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाशी संपर्क करा.