महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 08 एप्रिल 2025 पासून ‘या’ मार्गांवर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या जिल्ह्यांतुन धावणार ट्रेन ?

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर एक स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून या गाडीमुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्ट्यांची चर्चा आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावी परतणार आहेत. कामानिमित्ताने मुंबई पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर सारख्या महानगरांमध्ये स्थायिक झालेले बाहेर राज्यातील नागरिक उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी परतणार आहेत.

काहीजण आपल्या नातलगांकडे जातील तर काहीजण पिकनिक साठी बाहेर पडणार आहेत. यामुळे दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत रेल्वे गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळत नाही.

हेच कारण आहे की रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी या अनुषंगाने कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल चालवण्यात येणार आहे.

दरम्यान आज आपण या साप्ताहिक समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेऊ शकते ? या संदर्भातही थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल ८ एप्रिल ते १० जून या कालावधीत दर मंगळवारी धावणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी इरोड येथून सकाळी ६.२० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता बारमेर येथे पोहचणार आहे.

दुसरीकडे, परतीच्या प्रवासात ही गाडी ११ एप्रिल ते १३ जूनदरम्यान दर चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर शुक्रवारी बारमेर येथून रात्री १०.५० वा. सुटणार आहे.

तसेच बारमेर येथून रवाना झाल्यानंतर ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री ८.१५ वाजता इरोड येथे पोहचणार आहे. आता आपण या स्पेशल ट्रेनला कोणकोणत्या स्थानकावर थांबा मिळाला आहे याची माहिती पाहूयात.

या रेल्वेस्थानकावर थांबणार ट्रेन

कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या समन्वयाने सुरू केल्या जाणाऱ्या या स्पेशल ट्रेनला कोकण मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही गाडी मडगाव, करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आदी स्थानकात थांबा घेणार आहे. यामुळे या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe