Maharashtra Pune Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
पुणे ते नागपूर दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

खरेतर, राज्यातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचे आरक्षण तीन महिन्यापूर्वीच रेल्वेचे ‘फुल्ल’ झाले. नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने नियोजन केले आहे.
नागपूर ते पुणे साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी अहिल्यानगर मधून जाणार आहे यामुळे अहिल्यानगर मधील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
या दोन्ही शहरादरम्यान या विशेष गाडीच्या 14 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार वेळापत्रक ?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01440 ही विशेष गाडी 13 एप्रिल ते 25 मे दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर रविवारी नागपूर येथून 16.15 वाजता सोडली जाणार आहे आणि पुणे येथे सोमवारी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 01439 ही विशेष गाडी 12 मार्च ते 24 मे 2025 पर्यंत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर शनिवारी सोडली जाणार आहे.
पुणे येथून ही ट्रेन 19.55 वाजता सोडली जाणार आहे आणि नागपूर येथे रविवार रोजी 14.45 वाजता पोहोचणार आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार स्पेशल ट्रेन
या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबा राहणार आहे. आठ वातानुकूलित द्वितीय, 10 वातानुकूलित तृतीय आणि दोन जनरेटर कार अशी गाडीची संरचना राहणार आहे.