अहिल्यानगरच्या आरोग्य व्यवस्थेचा राज्यभर गौरव, जिल्हा रुग्णालयाने राज्यात पटकावला दुसरा क्रंमाक

राज्यस्तरावरील मूल्यांकनात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने ४९.८० गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. वाशिम पहिल्या क्रमांकावर आहे. आरोग्य सेवा, सुविधा व कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर आधारित निर्देशांक तयार करण्यात आला आहे.

Published on -

अहिल्यानगर- राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीचे दरवर्षी मूल्यांकन केले जाते. या मूल्यमापनात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने यंदा उल्लेखनीय यश मिळवले असून, ४९.८० गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे.

वाशिम जिल्ह्याने ५५.९१ गुण मिळवत प्रथम क्रमांक घेतला आहे, तर नाशिक, कोल्हापूर आणि हिंगोली अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

सुविधा, उपचार आणि व्यवस्थापनात उत्तम कामगिरी

या रँकिंगसाठी रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, तपासणी आणि औषधोपचारांची गुणवत्ता, वेळेवर उपचार मिळणे, शस्त्रक्रियेचे यश, तसेच डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता यांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभर आपले स्थान बळकट केले आहे.

स्वच्छ परिसराचे मुल्यमापन

मूल्यमापन करताना रुग्णालय परिसर स्वच्छ आणि सुटसुटीत आहे का, रुग्णांना दिलासा देणारे वातावरण उपलब्ध आहे का, रुग्णांच्या उपचारानंतर आरोग्यस्थितीत सुधारणा झाली का, या ही घटकांचा विचार केला जातो. या सगळ्या बाबतीत अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने उल्लेखनीय प्रगती साधली असून, रुग्णांचे समाधान आणि विश्रांती यावर विशेष भर दिला गेला आहे.

आरोग्य प्रशासनाचे नियोजन

ही यशस्वी घोडदौड जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयबद्ध प्रयत्नांचे फलित आहे. आरोग्य विषयक विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, विशेष तपासणी शिबिरे आणि तत्पर सेवा या सगळ्याचा समन्वय साधत त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावला आहे.

राज्यस्तरावर गौरव

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या यशाची नोंद घेण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे हे यश इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायक ठरत असून, भविष्यात अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रात आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाण्याची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News