दररोज गव्हाच्या पोळ्या खाताय?, देताय ‘या’ आजारांना निमंत्रण; मग आरोग्यासाठी लाभदायक पोळ्या कशाच्या?

बहुतेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गव्हाच्या पोळ्या खाणं ही नेहमीची सवय असते. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते गव्हाच्या पोळ्या जास्त खाल्ल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि बीपी वाढू शकतो. या ऐवजी काय खायला हवे, याबाबतही आरोग्यतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

Published on -

Wheat Roti Side Effects | गव्हाच्या पोळ्या हे भारतीय आहारातील एक महत्त्वाचं अंग आहे. बहुतेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गव्हाच्या पोळ्या खाणं ही नेहमीची सवय असते. मात्र, आरोग्यतज्ज्ञांचा इशारा आहे की दररोज आणि मोठ्या प्रमाणात गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब (बीपी) यांसारखे गंभीर आजार वाढू शकतात. त्यामुळे सध्या गव्हाच्या पोळ्यांची जागा इतर पर्यायांनी घेणं गरजेचं ठरतंय.

गव्हाच्या पोळ्या का खाऊ नये?

गव्हामध्ये ग्लुटेन हा घटक असतो, जो अनेकांना पचत नाही. यामुळे पोट गच्च होणं, गॅसेस, ढेकर येणं, पित्त वाढणं असे त्रास होऊ शकतात. गव्हाच्या पोळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलोरीचं प्रमाण अधिक असल्याने, ती पचायला जास्त वेळ लागते. विशेषतः रात्री गव्हाची पोळी खाल्ल्यास ती शरीरात चरबीच्या स्वरूपात साठू शकते. मधुमेही व्यक्तींना यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढू शकतं. त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ गव्हाच्या पोळ्या खाणं टाळावं, असं तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे.

गव्हाऐवजी काय खावे?

तज्ज्ञांच्या मते, सतत गव्हाची पोळी खाण्याऐवजी मल्टीग्रेन चपात्या खाणं अधिक फायदेशीर ठरतं. मल्टीग्रेन रोटीसाठी गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, हरबरा, मूगडाळ आणि उडदडाळ यांचं मिश्रण करून पीठ तयार करावं. अशा प्रकारे बनवलेल्या पोळ्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. या पोळ्या गव्हाच्या तुलनेत पचायला हलक्या आणि आरोग्यासाठी फायद्याच्या असतात.

तज्ज्ञ सांगतात की आठवड्यातून किमान 3-4 वेळा तरी गव्हाच्या ऐवजी इतर धान्यांची चपात्या खाव्यात. हे पर्याय तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि मधुमेहासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करू शकतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहारातील छोटे बदल आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे आता वेळ आहे, गव्हाच्या पोळीवरचा अतिरेक थांबवण्याची आणि चविष्ट, आरोग्यदायी पर्याय निवडण्याची.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News