Property Rights : सर्वसामान्यांच्या मनात वडिलोपार्जित संपत्तीबाबत विविध प्रश्न निर्माण होतात. जर तुमच्याही मनात वडीलोपार्जित संपत्ती बाबत असेच काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर, प्रत्येक पिढीला जुन्या पिढीकडून अनेक गोष्टी वारशात मिळत असतात. घर, गाडी, बंगला, सोने-नाणे अशा अनेक गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात.
म्हणजे एका पिढीने कमावलेली मालमत्ता त्याच्या दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. आता, तुम्हाला एका पिढीने कमावलेली मालमत्ता दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली म्हणजे ती मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता असेच वाटत असेल नाही का? मात्र, वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता असं म्हणणं पूर्णपणे अयोग्य आहे.

आजी-आजोबांकडून मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मानली जाते, पण यामध्ये काही विशेष कायदेशीर बाबी लक्षात घेणं या ठिकाणी फारच महत्त्वाच आहे. तसेच आज आपण वडिलोपार्जित मालमत्ता मृत्युपत्र बनवलेले नसल्यास कशा पद्धतीने वाटली जाते, किंवा मृत्युपत्र नसल्यास वडीलोपार्जित संपत्तीवर दावा कसा करायचा याच संदर्भात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मृत्युपत्र नसल्यास वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कसा करायचा ?
मृत्युपत्र नसल्यास वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कसा करायचा हा प्रश्न तुमच्याही मनात असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मालमत्ताधारकाचा मृत्यू झाला की, त्याची मालकी कायदेशीर वारसाच्या नावावर करावी लागते अन यासाठी नोंदणी करावी लागते.
मात्र बऱ्याच लोकांना यासंदर्भातील कायदे, प्रक्रिया आणि नियमांची स्पष्ट माहिती नसते. यामुळे ही प्रक्रिया जास्तच गुंतागुंतीची वाटते. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीचं वाटतं असते. दुसरीकडे, केवळ नोंदणी करून मालकी हक्क मिळत नाही, तर दाखल-खारीज प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागते.
तसेच, मालमत्तेवरील इतर वारसांचा हक्क, त्यांची संख्या आणि संबंधित कागदपत्रांची पूर्तता यावरही ही सर्व प्रक्रिया अवलंबून राहत असते. जाणकार लोक सांगतात की वडिलोपार्जित मालमत्ता वाटप करताना मृत्युपत्राचा मोठा रोल असतो.
जर एखाद्याला वडिलोपार्जित मालमत्ता आपल्या नावावर करायची असेल, तर त्याच्याकडे वारसाहक्काचा योग्य पुरावा असणे आवश्यक आहे. जर समजा मूळ मालकाने मृत्युपत्र तयार केले असेल, तर मग संपत्तीचे हस्तांतरण अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने होते.
पण, मृत्युपत्र बनवलेले असेल तरीदेखील वाद उद्भवू शकतो. पण अशी परिस्थिती 100 प्रकरणांमध्ये एखाद्याच प्रकरणात उद्भवते. जर मृत्युपत्रात काही वादग्रस्त बाबी असतील, तर अशा प्रकरणात संबंधित मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिल जाऊ शकत. दरम्यान आता आपण जर मृत्युपत्र नसेल, तर मालमत्तेचे वाटप कसे होणार हे समजून घेणार आहोत.
तज्ञ लोक सांगतात की, मृत्युपत्र नसेल तर अशा प्रकरणांमध्ये सर्व कायदेशीर वारसांना परस्पर सहमतीने मालमत्तेची वाटणी करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. ही वाटणी ‘कुटुंब समझोता’ म्हणून उपनिबंधक कार्यालयात नोंदवावी लागते. यासाठी संबंधित मालमत्तेची कागदपत्रे, वारसांची यादी आणि इतर आवश्यक माहिती सुद्धा सादर करावी लागणार आहे.
तसेच, इच्छापत्र नसल्यास शपथपत्र तयार करून सर्व वारसांकडून ना हरकत प्रमाणपत्र ज्याला इंग्रजीत NOC म्हणतात ते घेणेही आवश्यक आहे. एवढेच नाही तर असे शपथपत्र बनवताना जर एखाद्या वारसाला रोख पैसे दिले असतील, तर त्याचा स्पष्ट उल्लेख सुद्धा करावा. हस्तांतरणाच्या दस्तऐवजात याचा उल्लेख करावा लागतो.
म्हणूनच मालमत्ता हस्तांतरणाच्या या सगळ्या प्रक्रियेत कायदेशीर मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही. यामुळे जर इच्छापत्र नसताना मालमत्तेचे हस्तांतरण करायचे असेल तर या गुंतागुंतीच्या प्रकरणात कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विशेष वकील नेमून ही प्रक्रिया पुढे नेणे संबंधितांसाठी फायद्याची ठरू शकते.