दहावी-बारावीत नापास! पुढे पहिल्याच अटेम्प्टमध्ये UPSC पास झाल्या, वाचा अंजू शर्मा यांची सक्सेस स्टोरी

दहावी आणि बारावीत नापास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी खचून जातात.मात्र, अंजू शर्मा यांनी या महत्वाच्या परीक्षा नापास होऊनही हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न करत जिद्दीने परीक्षा दिल्या. इतकंच नाही तर UPSC परीक्षा देखील त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पास केली,त्यांचीही कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Published on -

IAS Anju Sharma story | यूपीएससी परीक्षा म्हटली की लोकांच्या मनात कायम एक गोष्ट येते, ती म्हणजे ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी अभ्यासात हुशार असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण अशा यशोगाथा ऐकतो जिथे उमेदवार शालेय जीवनात नेहमीच टॉपर असतात. मात्र आयएएस अधिकारी अंजू शर्मा यांची कहाणी या साच्यात बसणारी नाही. त्यांच्या जीवनप्रवासात अपयश होते, चुका होत्या, पण त्याहून मोठी होती त्यांची चिकाटी आणि आत्मविश्वास.

कोण आहेत अंजू शर्मा?

अंजू शर्मा यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. त्यांच्या शालेय जीवनात त्यांना खूप संघर्षांना सामोरे जावे लागले. त्या दहावीच्या प्री-बोर्ड परीक्षेत आणि बारावीच्या अंतिम परीक्षेत अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या होत्या. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावतात, पण अंजू यांनी अपयशातून शिकण्याचा निर्णय घेतला.

अपयश पचवून त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा सुरू केली. त्यांनी बीएससी (विज्ञान) मध्ये शिक्षण घेतले आणि सुवर्णपदक मिळवले. पुढे एमबीए पूर्ण करून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. वयाच्या 22 व्या वर्षी, 1991 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनल्या.

‘या’ जबाबदाऱ्या सांभाळल्या-

त्यांची पहिली पोस्टिंग गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्या जिल्हाधिकारी झाल्या आणि गांधीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी विशेष सचिव, सचिव, प्रधान सचिव आणि सध्या अतिरिक्त मुख्य सचिव या वरिष्ठ पदांपर्यंत मजल मारली आहे.

अंजू शर्मांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ती शिकवते की अपयश ही अंतिम गोष्ट नसते. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. त्यांनी आपल्या जीवनातून हेच दाखवून दिलं आहे की सुरुवातीच्या चुका भविष्य ठरवत नाहीत, तर त्यातून शिकून पुढे जाण्याची वृत्तीच यशाचं दार उघडते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News