IDBI Bank Recruitment 2025 | जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. IDBI बँकेने Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा घेण्यात येणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी सुवर्णसंधी ठरणार आहे.
IDBI बँकेच्या या भरतीत एकूण 119 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 7 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 20 एप्रिल 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

भरती पदे कोणती?
या भरतीअंतर्गत उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager – DGM) ग्रेड D साठी 8 पदे, सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager – AGM) ग्रेड C साठी 42 पदे आणि व्यवस्थापक (Manager) ग्रेड B साठी 69 पदे उपलब्ध आहेत.
प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता वेगवेगळी असून उमेदवारांकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, वित्त विभागात DGM पदासाठी उमेदवारांकडे CA किंवा MBA (Finance) पदवी आणि BFSI क्षेत्रात किमान 10 वर्षांचा अनुभव असावा, त्यात 7 वर्षे संबंधित क्षेत्रात असणे आवश्यक आहे.
कायद्याच्या विभागात AGM पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी असावी. त्याचबरोबर 7 वर्षांचा कायदा अधिकारी म्हणून अनुभव किंवा 4 वर्षांचा स्वतंत्र वकील म्हणून अनुभव असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड वय, पात्रता, अनुभव यावर आधारित प्राथमिक मूल्यांकनानंतर मुलाखत किंवा गट चर्चा (GD/PI) घेऊन केली जाणार आहे. अंतिम निवड ही सर्व टप्पे पार केल्यानंतरच होईल.
अर्ज करण्यासाठी सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ₹1,050 इतके असून SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹250 इतके शुल्क आकारण्यात आले आहे. शुल्काचे पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS किंवा मोबाईल वॉलेटद्वारे करता येईल.