SSC Result 2025 | दहावीचा (SSC) निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा! 2025 साली मार्चमध्ये संपलेल्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, ते म्हणजे दहावीचा निकाल कधी लागणार?
कधी लागणार निकाल?
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षीचा SSC निकाल 15 मेपूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ही माहिती अजून अधिकृत नाही, मात्र काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार निकालाच्या प्रक्रियेने वेग घेतला असल्याचे समजते आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासात यंदाचा दहावीचा निकाल सर्वात लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली. परीक्षेनंतर लगेच उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्यात आली असून, यंदा निकाल वेळेत लागावा यासाठी यंत्रणा अधिक सतर्क आहे.
पुरवणी परीक्षाही लवकरच?
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस लागणारा दहावीचा निकाल यावर्षी दुसऱ्या आठवड्यातच जाहीर होण्याची योजना आहे. यामागे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लवकर संधी मिळावी, हा उद्देश आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक खोट्या तारखा आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र मंडळाकडून अजून निकालाची अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (mahresult.nic.in) नियमितपणे नजर ठेवणे गरजेचे आहे.