अहिल्यानगर शहरातील अद्ययावत ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू ग्रंथालयासह अँपी थिएटर, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध होणार

Published on -

अहिल्यानगर – सावेडी उपनगर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. या ग्रंथालयासाठी पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध झाला आहे. सद्यस्थितीत प्लिंथ लेव्हलपर्यंत काम पूर्ण झाले आहे. येत्या दीड वर्षात काम पूर्ण होऊन ग्रंथालय कार्यान्वित होणार असल्याची आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ग्रंथालयाच्या इमारतीच्या कामाची माहिती घेतली. २० हजार चौरस फूट बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये ५०० विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुविधा असणार आहे. इमारतीचे बांधकाम, फर्निचर, विद्युतीकरण, आग प्रतिबंधक उपाययोजना आदी कामे प्रस्तावित आहेत. इमारतीमध्ये तळ मजल्यावर ग्रंथपाल कक्ष, उप-ग्रंथपाल कक्ष, इलेक्ट्रिकल कक्ष, प्रतिक्षालय, अँपीथिएटर, सर्वसाधारण वाचन विभाग, संगणक विभाग, संदर्भ विभाग, वृत्तपत्र व मासिक विभाग स्वागत कक्ष असणार आहे. पहिल्या मजल्यावर ऑडिओ व्हिज्युअल विभाग, सर्वसाधारण वाचन विभाग, संगणक विभाग, संदर्भ विभाग, एमपीएससी व यूपीएससी विद्यार्थी विभाग, स्वागत कक्ष असणार आहे.

प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. प्लिंथ लेव्हलपर्यंत काम झाले आहे. दीड वर्षात म्हणजेच मुदतीत हा प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित केला जाणार आहे. ग्रंथालयासह विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरात प्रथमच असे सुसज्ज व सर्व सुविधायुक्त, अद्ययावत ग्रंथालय होत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News