किआ सेल्टोसवर फक्त ₹1 मध्ये विमा आणि ₹55,000 ची सूट, एक्सचेंज बोनसही मिळणार

Kia Seltos वर एप्रिलमध्ये तब्बल ₹55,000 सूट जाहीर करण्यात आली आहे. तसेच ₹1 मध्ये विमा आणि फ्री अॅक्सेसरीजसह जबरदस्त ऑफर देखील देण्यात आल्या आहेत. या महिन्यात तुम्हाला जर SUV खरेदी करायची असेल तर हीच बेस्ट संधी ठरेल.

Published on -

Kia Seltos April Discount | एप्रिल 2025 मध्ये किआ (Kia) आपल्या लोकप्रिय SUV सेल्टोसवर ग्राहकांसाठी शानदार ऑफर घेऊन आली आहे. कंपनी या महिन्यात Kia Seltos SUV वर ₹55,000 पर्यंतची जबरदस्त सूट देत असून, केवळ ₹1 मध्ये comprehensive विमा योजना देखील देत आहे. त्यामुळे SUV खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी ही एक आकर्षक संधी आहे.

जाणून घ्या ऑफर-

या ऑफरअंतर्गत किआ सेल्टोस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹40,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्यासोबतच, ₹15,000 ची कॉर्पोरेट सूटदेखील दिली जात आहे. दिल्ली आणि एनसीआर झोनमधील ग्राहकांना कंपनी फक्त ₹1 मध्ये विमा देखील देत आहे. याशिवाय, कंपनी मोफत अॅक्सेसरीजचा फायदा देऊन ग्राहकांचा अनुभव आणखी चांगला करते. किआ सेल्टोस भारतात मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara), ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), आणि होंडा एलिव्हेट (Honda Elevate) यांसारख्या SUV गाड्यांना टक्कर देते.

कारची वैशिष्ट्ये-

2025 Kia Seltos विविध ट्रिम्समध्ये येते आणि त्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे. HTE(O) व्हेरिएंटमध्ये 8-इंच टचस्क्रीन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 6-स्पीकर ऑडिओ सिस्टीम आहे. स्टीयरिंगवर ऑडिओ आणि कॉल कंट्रोल्स, मागील कॉम्बी एलईडी लॅम्प्स आणि स्टायलिश रियर व्ह्यू मिरर यामुळे ही SUV आकर्षक आणि फंक्शनल दिसते.

HTK(O) प्रकारामध्ये 16-इंच अलॉय व्हील्स, पॅनोरॅमिक सनरूफ, रूफ रेल्स आणि मागील वायपरसह वॉशर व डिफॉगरचा समावेश आहे. यात क्रूझ कंट्रोल, ऑल पॉवर विंडोज आणि आकर्षक मूड लाइट्स आहेत. स्मार्ट की मध्ये मोशन सेन्सर फिचर देखील आहे, जे सेगमेंटमध्ये वेगळेपण आणते.

दमदार परफॉर्मन्स

HTK+ (O) ट्रिममध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, EPB IVT, शक्तिशाली एलईडी फॉग लॅम्प्स आणि MFR LED हेडलॅम्प्स मिळतात. LED टर्न सिग्नल्स, ऑटो फोल्ड ओआरव्हीएम, व्यावहारिक पार्सल ट्रे आणि स्मार्ट की यामुळे ही गाडी केवळ सुंदरच नव्हे, तर फंक्शनल आणि सुरक्षितही बनते.

Kia Seltos ही SUV आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायक इंटीरियर आणि दमदार परफॉर्मन्स यासाठी ओळखली जाते. एप्रिल महिन्याच्या या ऑफरमुळे ती आता अधिक परवडणारी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News