महिंद्रा XUV400 EV वर तब्बल ₹4 लाखांची सूट; फुल चार्जवर 456 km रेंज देणारी दमदार SUV

महिंद्राच्या XUV400 EV वर एप्रिलमध्ये ₹4 लाखांपर्यंतची सूट जाहीर झाली आहे.फुल चार्जवर 456 किमी रेंज, स्टायलिश फीचर्ससह ती खरेदीसाठी मोठी संधी असणार आहे. या ऑफरबद्दल अधिक माहिती सविस्तर जाणून घेऊयात-

Published on -

Mahindra XUV400 EV | महिंद्रा (Mahindra) ने आपल्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV XUV400 EV च्या MY2024 मॉडेलवर एप्रिल 2025 मध्ये ग्राहकांसाठी आकर्षक सूट जाहीर केली आहे. यामुळे कारप्रेमींना तब्बल ₹4 लाखांपर्यंतची बचत होऊ शकते. या सूटमुळे ग्राहकांना एक जबरदस्त पर्याय मिळतो आहे – दमदार परफॉर्मन्स, लांब रेंज आणि स्टायलिश लूकसह इलेक्ट्रिक SUV खरेदी करण्याचा.

कारची वैशिष्ट्ये-

महिंद्रा XUV400 EV ही एक पाच सीटर इलेक्ट्रिक SUV असून, यात दोन प्रकारचे बॅटरी पॅक पर्याय दिले आहेत – 34.5kWh आणि 39.4kWh. या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये एक 150bhp पॉवर आणि 310Nm टॉर्क निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. 34.5kWh बॅटरी व्हेरिएंट सिंगल चार्जवर 375 किमी रेंज देते, तर मोठा 39.4kWh बॅटरी व्हेरिएंट 456 किमीची सर्टिफाइड रेंज देतो. हे मॉडेल खास शहरांतील तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परिपूर्ण आहे.

कारमध्ये असणाऱ्या प्रीमियम फिचर्समध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन एसी, सनरूफ, आणि वायरलेस फोन चार्जिंग यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, सेफ्टीच्या दृष्टीने 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि रिअर पार्किंग कॅमेरा देखील दिला आहे.

किंमत-

महिंद्रा XUV400 EV ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत ₹16.74 लाख असून, टॉप व्हेरिएंटची किंमत ₹17.69 लाखांपर्यंत जाते. मात्र एप्रिल महिन्याच्या खास सवलतीमुळे ही SUV आणखी किफायतशीर ठरत आहे. ग्राहक या सवलतीबद्दल अधिक माहिती आणि अचूक ऑफर्ससाठी त्यांच्या जवळच्या महिंद्रा डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि महिंद्रा XUV400 EV या क्षेत्रात दमदार आविष्कार करत आहे. जर तुम्ही एक पॉवरफुल, स्टायलिश आणि लॉन्ग रेंज EV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही SUV तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News