फक्त ₹500 च्या आत मिळवा हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह फ्री डेटा; 2025 मधील बेस्ट डेटा प्लॅन्स नक्की पाहा!

₹500 पेक्षा कमी बजेटमध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि हॉटस्टार फ्री मिळवण्याची मोठी संधी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. Airtel, Jio आणि Vi चे टॉप फायदेशीर प्लॅन्स एकदा नक्की बघा.

Published on -

Daily 2.5GB Data Plans | आजच्या डिजिटल युगात इंटरनेटशिवाय आयुष्य अशक्य वाटतं. सोशल मीडिया, ऑफिस वर्क, ऑनलाईन स्ट्रीमिंग, कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी दररोज जास्त डेटा लागतो. त्यामुळे अनेकांना दररोज किमान 2.5GB डेटा असलेला स्वस्त आणि फायदेशीर मोबाईल प्लॅन हवा असतो. जर तुमचं बजेट ₹500 पेक्षा कमी असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. खाली जिओ, एअरटेल आणि Vi चे असे 5 टॉप प्रीपेड प्लॅन्स दिले आहेत जे दररोज 2.5GB डेटा देतात आणि त्यात जिओ हॉटस्टारसारख्या मोफत सबस्क्रिप्शन सुविधाही आहेत.

Airtel ₹409 प्लॅन-

या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. यात अमर्यादित 5G डेटा, स्पॅम अलर्ट, Xstream Play Premium सबस्क्रिप्शन, आणि Hello Tunes यांसारखे फ्री फायदे आहेत.

Airtel ₹429 प्लॅन

1 महिन्याची वैधता असलेला हा प्लॅनही दररोज 2.5GB डेटा देतो. कॉलिंग आणि SMS फ्री असून यात Xstream अ‍ॅप, Apollo 24/7, Hello Tunes आणि 5G डेटा मिळतो.

Jio ₹399 प्लॅन

28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल्स, 100 SMS मिळतात. खास बाब म्हणजे यामध्ये 90 दिवसांसाठी Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन, JioTV आणि JioCloud ची मोफत सुविधा आहे.

Vi ₹409 प्लॅन

Vi चा हाही प्लॅन 28 दिवसांचा असून दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि 100 SMS मिळतात. यात Unlimited 5G (मुंबईपुरता), Data Delight, Weekend Data Rollover आणि बरेच फायदे मिळतात.

Vi ₹469 प्लॅन

28 दिवसांसाठी 2.5GB डेटा आणि सर्व बेसिक सेवा यामध्ये आहेत. यासोबत 3 महिन्यांसाठी Disney+ Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शनही फ्री दिले जाते. Weekend Rollover आणि Unlimited Data Delight सारखे अतिरिक्त फायदेही आहेत.

जर तुम्ही स्ट्रीमिंग लव्हर असाल किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल, तर हे सर्व प्लॅन्स तुमच्या गरजांनुसार खूपच फायदेशीर आहेत. विशेषतः जिओ आणि Vi चे प्लॅन हॉटस्टार सबस्क्रिप्शनमुळे अधिक आकर्षक ठरतात. Airtel प्लॅनमध्ये Xstream आणि हेल्थ सबस्क्रिप्शनसारखे वेगळे फायदे आहेत. बजेट ₹500 च्या आत असे प्लॅन्स शोधणाऱ्यांसाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News