पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 2 नवीन उड्डाणपूल ! 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या शहरातील सुधारित उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या सुधारित उड्डाणपूल प्रकल्पाच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून यासाठी 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःची माहिती दिली आहे.

Updated on -

Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत तसेच काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत.

पश्चिम महाराष्ट्राला गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची भेट मिळाली आहे. अशातच, आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोलापूर शहरात दोन नवीन उड्डाणपूल तयार केले जाणार असून आता याच उड्डाणपूल प्रकल्पाबाबत एक मोठे अपडेट हाती आले आहे.

966.24 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर शहरातील सुधारित उड्डाणपूलांच्या प्रकल्पासाठी 966.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. सोलापूर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावाला रविवारी 6 एप्रिल 2025 रोजी मान्यता मिळाली असून यासाठी आवश्यक निधीची देखील तरतूद करून देण्यात आली आहे. दरम्यान, आता आपण याच प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जमिनीचे भूसंपादन

कसे असणार प्रकल्प सोलापूर शहरातील सुधारित उड्डाणपूल प्रकल्पाच्या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाली असून यासाठी 966.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढल्या महिन्यात म्हणजेच मे अखेरपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

मे 2025 अखेरपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरेतर, सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. मुंबई, पुणे प्रमाणेच या शहरातही अलीकडील काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या भीषण बनली आहे.

दोन उड्डाणपूल मंजूर

दरम्यान हीच बाब विचारात घेऊन आता या शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर करण्यात आले आहेत. खरंतर हे उड्डाणपूल आताच मंजूर झाले आहेत असे नाही तर उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली आहेत.

पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे सोलापूर शहरातील या उड्डाणपूल प्रकल्पांचा प्रश्न अजूनही दूर झालेला नाही. हे उड्डाणपूल अजूनही कागदावरच आहेत. तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब झाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोलापूर शहरात जुना पुणे नाका ते पत्रकार भवन 5.45 किलोमीटर (फेस वन), जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला पाच किलोमीटर (फेस टू) असे दोन उड्डाणपुल विकसित केले जाणार आहेत.

प्रकल्पांचे काम फक्त कागदावरच

गेल्या नऊ वर्षांपासून या प्रकल्पांचे काम फक्त कागदावरच आहे मात्र आता प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. खरेतर या प्रकल्पासाठी एकूण 133 मिळकती बाधित होणार आहेत.

यातील फेस वनच्या भूसंपादनाची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. मात्र, फेस दोनमधील बाधित होणाऱ्या शासकीय कार्यालयांनी यां महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा ताब्यात दिली नसल्याने यां दोन्ही उड्डाणपुलांचा प्रस्ताव रखडलाय. मात्र आता भूसंपादनाचे कामे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे आणि या प्रकल्पासाठी भरीव निधीची सुद्धा तरतूद करून देण्यात आली आहे. यामुळे सोलापूर शहरात भविष्यात हे प्रस्तावित उड्डाणपूल साकार होतील आणि यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल अशी आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा शहरातील उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्ग-65 वर विकसित होणार आहे. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका यादरम्यानच्या 9.66 कि.मी. लांबीवर हा उड्डाणपूल विकसित होणार आहे. फेज एक अन फेज 2 असे दोन उड्डाणपूल तयार केले जातील. हे 4-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर असतील.

म्हणजे यात 4-लेन एलिव्हेटेड मुख्य कॅरेजवे असतील. 6 एंट्री आणि एक्झिटचे रॅम्प राहणार आहेत. यात 2-लेनचा सर्व्हिस रस्ता असेल याची लांबी जवळपास साडेनऊ किलोमीटर पर्यंत राहू शकते. म्हणूनच या प्रकल्पामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News