हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात ! हापूस आंब्याच्या दरात झाली मोठी घसरण, आता डझनभर आंब्यांसाठी मोजावी लागणार फक्त एवढी रक्कम !

30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. अक्षय तृतीयाच्या सणाला नेहमीप्रमाणे यंदाही आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अक्षय तृतीयाच्या आधीच सर्वसामान्य खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हापूसच्या रेटमध्ये गुढीपाडव्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात कपात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Published on -

Hapus APMC Rate : आंबा हा फळांचा राजा आणि आंब्याचा राजा हापूस. एप्रिल महिना सुरू झाला की हापूसची चव चाखण्यासाठी खवय्ये आतुर होतात. उन्हाळा हा खवय्यांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो कारण की या महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये आंब्याची आवक वाढते. दरम्यान सालाबादाप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होताना दिसत आहे.

हापूसची आवक देखील बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून खवय्यांसाठी, विशेषतः हापूस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हापूस आंब्याच्या दरात आता मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

खरे तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळाला होता. त्यावेळी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होता असे म्हटले तर काही अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण की तेव्हा हापूस च्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या.

आता मात्र याच्या किमतीत घसरन झाली आहे आणि म्हणूनच हापूसची चव सामान्यांच्या आवाक्यात आली आहे अशा चर्चा बाजारांमध्ये पाहायला मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजधानीत हापूसच्या दरात मोठी घसरण झाली असून हापूसची जोरदार आवक होत आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काल अर्थातच 8 एप्रिल 2025 रोजी हापूसची बंपर आवक झाली. तब्बल एक लाख हापूस आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्यात. यामुळे आंब्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

गुढीपाडव्यानंतर प्रथमच हापूस आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी राज्यात तसेच देशात अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. अक्षय तृतीयाच्या सणाला महाराष्ट्रात पुरणपोळी आणि आमरसचा वाण बनवला जातो.

विशेषता खानदेशात अक्षयतृतीयाला आमरस आणि पुरणपोळी बनवतात. दरम्यान आता अक्षय तृतीयाच्या आधीच आंब्याच्या दरात घसरण झाली असल्याने अक्षय तृतीयाला सर्वसामान्यांना कमी किमतीत हापूसची चव चाखता येणार असल्याचा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.

काल नवी मुंबईच्या बाजारात आलेल्या 80 हजार पेट्या थेट कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आल्या होत्या. तर उर्वरित 20 हजार पेट्या कर्नाटक आणि केरळ राज्यांसारख्या परराज्यातून दाखल झाल्यात. दरम्यान कालच्या हापूस आंब्यांना अगदीच साठ रुपये प्रति किलो पासून भाव मिळाला.

यामध्ये परराज्यातील हापूस आंब्याला राज्यातील हापूस आंब्याच्या तुलनेत कमी दर मिळाल्याचे दिसले. खरेतर, सध्या परराज्यातील हापूस 60 ते 120 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे आणि कोकणातील चार डझन हापूस आंब्याच्या पेटीला पंधराशे रुपयांपासून भाव मिळत आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या पेटीला जवळपास 3500 पर्यंतचा कमाल भाव मिळतोय. कोकणातील हापूस आंब्याला 375 रुपयांपासून ते 875 रुपये डझन असा भाव मिळतोय. यामुळे नक्कीच राज्यातील खवय्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता खवय्यांना हापूस आंब्यावर मनसोक्त ताव मारता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe