Mumbai News : मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. सध्या मुंबईतील कमाल तापमान चाळीस अंशाच्या पार गेले आहे अन याचं तीव्र उन्हाच्या झळामध्ये मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. कारण की शहरातील एक महत्त्वाचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणून शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू शकते आणि यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
हा पूल पुढील दोन वर्ष वाहतुकीसाठी बंद
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईतील शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पाच्या कामासाठी एल्फिन्स्टन पूल आज पासून सर्वसामान्यांसाठी बंद केला जाणार आहे. 10 एप्रिलपासून हा ब्रिज दोन वर्षांसाठी बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. या पूलावरुन पुढील दोन वर्ष कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाहीये.

यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हीही या मार्गाने प्रवास करत असाल तर तुम्ही या बदलाची नोंद घ्यायला हवी आणि हा पुल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करायला हवा. दरम्यान आता आपण हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद झाला असल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणते पर्याय मार्ग उपलब्ध आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
कसे असतील पर्यायी मार्ग ?
मिळालेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या भागातुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी मडके बुवा चौक (परळ टर्मिनस जंक्शन) पासून उजवीकडे वळून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने आपली वाहने घेऊन जायची आहेत. तसेच, खोडादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) पासून डावीकडे टिळक ब्रिजमार्गे वाहनचालकांना पुढे आपल्या इच्छित स्थळी पोहचता येणार आहे.
तसेच, वाहनचालकांना मडके बुवा चौकापासून (परळ टी.टी. जंक्शन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे थेट कृष्णा नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन आणि भारत माता जंक्शन मार्गे पुढे प्रवास करता येणार आहे. तेथून, लोअर परळ ब्रिजवर जायचे असल्यास वाहन चालकांना महादेव पालव रोडवर उजवीकडे वळून, करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून, आणि नंतर शिंगटे मास्टर चौकातून उजवीकडे वळून लोअर परळ ब्रिजवर पोहोचता येणार आहे.
शिवाय, वाहनचालकांना या नव्या बदलानंतर आपली वाहने खोडादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) पासून उजवीकडे वळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे घेऊन जाता येणार आहेत.
इतर पर्यायी मार्ग पहा….
याशिवाय वाहनचालकांना संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) येथून सरळ पुढे नेता येणार आहेत. या भागातील वाहनचालकांना वडाचा नाका जंक्शनपासून डावीकडे वळून लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जाता येणार आहे.
दरम्यान शिंगटे मास्टर चौक येथे डावीकडे वळण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे. डावीकडे वळून महादेव पालव रोड आणि करी रोड रेल्वे ब्रिज मार्गे मग वाहनचालकांना आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचता येईल अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाहनचालकांना या वाहतुकीत झालेल्या बदलानंतर संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) पासून सरळ जाता येणार आहे. वाहनचालकांना वडाचा नाका जंक्शन येथे डावीकडे वळावे लागणार आहे.
शिंगटे मास्टर चौक येथे पोहोचण्यासाठी याच मार्गाने वाहने लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जाऊ शकणार आहेत. त्यानंतर, मग वाहने महादेव पालव रोडवर डावीकडे वळतील आणि करी रोड रेल्वे ब्रिजमार्गे भारतमाता जंक्शनकडे जाऊ शकणार आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे या भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावी लागणार आहेत. दरम्यान, हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने याचा मुंबईतील नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.