Mumbai Metro News : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या जे मेट्रो मार्ग सुरू आहे त्यांचा विस्तार देखील केला जातोय. अशातच आता मुंबई मेट्रोच्या बाबत एक मोठी अपडेट हाती आले आहे. मुंबई शहरातील नागरिकांना लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.
यामुळे मुंबईकरांचा प्रवास ऐन उन्हाळ्यात गारेगार होईल अशी आशा आहे. खरे तर सध्या मुंबईमध्ये तापमानाचा पारा चाळीस अंशाला टच करतोय अन यामुळे मुंबईकर अक्षरशः घामाघुम होत आहेत.

दरम्यान याच तीव्र उष्णतेच्या काळात मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी मुंबई मेट्रो लाईन 3 चा म्हणजेच एक्वा मेट्रो लाईन चा दुसरा टप्पा येत्या काही दिवसांनी मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील आठवड्यात मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला केला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. अशा परिस्थितीत आज आपण याच प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत डिटेल्स?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मेट्रो लाईन 3 चा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या आधी मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) आयुक्त या मेट्रो मार्गाची तपासणी करणार आहेत. मेट्रो मार्ग तीन किंवा अॅक्वा लाईन ही मार्गीका ऑक्टोबर 2024 मध्ये अंशतः सुरू करण्यात आली होती.
गेल्या वर्षी या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना या मार्गाच्या 12.69 किलोमीटर लांबीच्या टप्प्यावर मेट्रोने प्रवास करता येणे शक्य झाले आहे.
याचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान सुरू आहे. आता दुसरा टप्पा, जो पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, तो बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत राहणार आहे.
सध्या या दुसऱ्या टप्प्यासाठी सुरक्षा मंजुरीची प्रतीक्षा आहे, जी तपासणीनंतर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या मेट्रो मार्गाचा तिसरा टप्पा जो की 13 किमीचा आहे तो शेवटचा टप्पा वरळी ते कफ परेड दरम्यान राहणार आहे आणि येत्या काही महिन्यांनी तो देखील मुंबईकरांसाठी खुला होऊ शकतो.
जुलै 2025 मध्ये या मेट्रो मार्गाचा शेवटचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचा दावा केला जातोय. दरम्यान हा मेट्रोमार्ग मुंबईकरांसाठी खुला झाल्यानंतर यावरील मेट्रो गाड्या 16 भूमिगत स्थानकांवर सेवा देतील, ज्यामुळे मध्य मुंबई आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल.
दुसऱ्या टप्प्यातील स्थानके कोणकोणती?
मुंबईतील महत्त्वकांक्षी अशा एक्वा लाईन म्हणजे मेट्रो लाईन 3 च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख स्थानकाबाबत बोलायचं झालं तर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात धारावी, सीतालादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके विकसित करण्यात आली आहेत.
या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा मेट्रो मार्ग मिठी नदी मधून जातो. धारावी आणि बीकेसी दरम्यानचा मार्ग मिठी नदीच्या खालून जातो म्हणून हा मार्ग इंजीनियरिंगचा एक अद्भुत चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. मिठी नदीच्या पाण्यातून जाणाऱ्या या मेट्रोमार्ग प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर आळा घालता येणार आहे.