अहिल्यानगर : वक्फ बोर्डाच्या विधेयकावर चर्चा करताना खासदार नीलेश लंके यांनी संसदेमध्ये आनंदॠषी हॉस्पिटलमध्ये गोर-गरीब रूग्णांवर उपचार होत असल्याचे सांगत रूग्णालयाचा देशाच्या संसदेत गौरव केल्याबद्दल जैन बांधवांनी खा.लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
महावीर जयंती निमित्त खा. नीलेश लंके यांनी अहिल्यानगरमधील आनंदधामला सदिच्छा भेट देत जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन बांधवांनी आनंदॠषीजी हॉस्प्टिलच्या सेवाभावी कार्याची संसदेमध्ये घेण्यात आलेली दखल ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे खा. लंके यांना आवर्जुन सांगितले.

यावेळी खा. लंके यांच्यासमवेत सतीश बोथरा, अशोक बोरा, रतिलाल भंडारी, रोशन गांधी, योगीराज गाडे, किरण काळे, संजय गारूडकर, सचिन गवारे, विशाल वालकर, ओंकार पाटील आदी मान्यवर होते.
सन्मान करणे ही माझी जबाबदारी
यावेळी खा. लंके यांनी अध्यात्मिक गुरूजनांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. समाज हितासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणे ही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी नम्रतापुर्वक नमुद केले. खा. लंके यांच्या भेटीप्रसंगी स्थानिक समाजबांधवांमध्ये आदर, उत्साह, आणि एकोप्याची भावना दिसून आली.
गुरूजनांकडून समाधान
आनंदधाममध्ये उपस्थित असलेल्या अध्यात्मिक गुरूजनांनीही या उल्लेखाबद्दल समाधान व्यक्त करत आमच्या सेवेचा गौरव केल्याचे सांगितले. हा उल्लेख हा समाजासाठी अभिमान आणि प्रेरणेचा क्षण आहे. लोकसभेच्या इतिहासात आमच्या कार्याची नोंद होणे ही मोठी बाब असल्याचे सांगत त्यांनी खा. लंके यांना धन्यवाद दिले.