Maharashtra Expressway News : राज्यातील एका बहुप्रतिक्षित रस्ते प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. अशातच आता ठाणे ते बोरिवली प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात आलेल्या ठाणे-बोरिवली टनेल रोड प्रकल्पाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मागाठाणे येथील ८७ झोपडीधारकांचे पुनर्वसन करणे हे या प्रकरणातील सर्वात मोठे आव्हान होते आणि या संबंधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात मोठा अडथळा देखील निर्माण झाला होता. दरम्यान आता याच संबंधित झोपडीधारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असल्याने या शासनाच्या महत्त्वकांक्षी अशा भुयारी मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे.

या मार्गातील एक मोठा अडथळा दूर झाला असल्याने आता या प्रकल्पाच्या कामाला मोठी गती प्राप्त होणार आहे. वास्तविक ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या भुयारी मार्गासाठी १८,८३८ कोटींचा खर्च केला जाणार असून यामुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या वीस मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. या सहा पदरी दुहेरी मार्गाची लांबी ११.८५ किमी इतकी असून यात १०.२५ किमी लांबीची टनेल विकसित केली जाणार आहे. या रस्ते विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
खरं तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. मात्र या प्रकल्पात काही अडथळे तयार झाले होते जे की आता दूर झाले आहेत आणि यामुळे नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल अशी आशा आहे. दरम्यान, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, उपजिल्हाधिकारी रोहिणी फडतरे आणि पंकज सोनवणे यांच्या उपस्थितीत झोपडीधारकांना पुनर्वसन झाल्यानंतर चाव्या सुद्धा देण्यात आल्या आहेत.
या भुयारी मार्गामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार असून, ठाणे-बोरिवली प्रवास अवघ्या २० मिनिटांत शक्य होणार आहे. दरम्यान आता या प्रकल्पाच्या कामास पुढील आठवड्यात सुरुवात होणार असून, हा प्रकल्प मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे.