HSRP नंबर प्लेट घरबसल्या ऑनलाइन मिळवा, ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठीची प्रोसेस जाणून घ्या

एचएसआरपी म्हणजेच उच्च सुरक्षा नंबर प्लेट आता प्रत्येक वाहनासाठी बंधनकारक आहे. ही प्लेट घरबसल्या सहज ऑनलाइन बुक करता येते. यामुळे वाहन अधिक सुरक्षित होते आणि चोरी झाल्यास शोधण्यात मदत होते.

Published on -

HSRP Number Plate Online | वाहनांची सुरक्षा आणि ट्रॅकिंग अधिक प्रभावी करण्यासाठी भारत सरकारने ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (HSRP) लावणे सर्व वाहनांसाठी बंधनकारक केले आहे. फक्त कायद्याचे पालन करणे हेच यामागचे कारण नाही, तर वाहन चोरीपासून संरक्षण करणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी ही प्रक्रिया थोडी जटिल वाटायची, मात्र आता तुम्ही तुमच्या घरबसल्या सहजपणे HSRP नंबर प्लेट ऑनलाइन बुक करू शकता. आणि काही दिवसांत ती तुमच्या पत्त्यावर पोहोचते.

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

अगोदर उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणजे काय, याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. ही प्लेट अॅल्युमिनियमपासून तयार केली जाते आणि त्यावर युनिक सिरीयल नंबर, लेसर एन्ग्रेव्हिंग, होलोग्राम आणि एक रंगीत स्टिकर असतो. या स्टिकरमध्ये वाहनाची इंधनप्रकार, नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन तारीख यांसारखी माहिती असते. चोरी झाल्यास वाहन शोधणे सोपे जावे, हाच यामागचा मुख्य हेतू आहे.

ही सुविधा केवळ नवीन गाड्यांसाठी नाही, तर 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यक आहे. यात दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, खासगी व व्यावसायिक वाहने यांचा समावेश आहे. नवीन वाहनांना ही प्लेट आधीच डिलरकडून बसवली जाते, परंतु जुन्या वाहनधारकांना ती स्वतंत्रपणे बसवावी लागते.

ऑनलाइन पद्धत-

ऑनलाइन पद्धतीने ही नंबर प्लेट बुक करणे खूप सोपे आहे. यासाठी [https://bookmyhsrp.com] किंवा (https://bookmyhsrp.com) या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. प्रथम राज्य व वाहनाचा प्रकार निवडा. त्यानंतर तुमच्या वाहनाचे आरसी नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर भरावेत. ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या नोंदणी प्रमाणपत्रावरून मिळेल. पुढे, फिटमेंटचा पत्ता आणि तारीख-वेळ निवडा, आणि नंतर ऑनलाइन फी भरा. साधारणतः दुचाकींसाठी ₹300 ते ₹400 आणि चारचाकींसाठी ₹500 ते ₹600 शुल्क आकारले जाते.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. ती प्रिंट किंवा PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवा, कारण प्लेट बसवताना ती आवश्यक असते. अशा प्रकारे घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही HSRP नंबर प्लेट मिळवू शकता.

ही सुविधा केवळ कायद्याचे पालन करण्यापुरती मर्यादित नाही, तर वाहनाच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे अजून HSRP नसेल, तर आजच ती ऑनलाइन बुक करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News