Citroen | भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये SUV गाड्यांचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतीय ग्राहक SUV मॉडेल्सकडे अधिक झुकताना दिसून येत आहेत. विशेषतः Hyundai Creta हे मॉडेल SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असून, याच श्रेणीत सध्या स्पर्धा वाढली आहे. आता या सेगमेंटमध्ये सिट्रोएनने आपले दोन नवीन मॉडेल्स – Citroen Basalt आणि C3 Aircross च्या डार्क एडिशन्ससह पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री घेतली आहे.
किंमत-
Citroen Basalt आणि C3 Aircross यापूर्वीही मार्केटमध्ये उपलब्ध होत्या, मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळेच ब्रँडने या SUV चे डार्क एडिशन लाँच करून ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न केला आहे. हे डार्क एडिशन्स स्टायलिश लूक, प्रीमियम इंटिरियर्स आणि विशेष फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत.

या SUV मॉडेल्सच्या किंमतींचा विचार केला तर, Citroen Basalt डार्क एडिशनची किंमत ₹15.31 लाख ते ₹16.83 लाख (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान आहे. तर C3 Aircross डार्क एडिशन ₹15.69 लाख ते ₹17.03 लाख (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून, ते 109 bhp पॉवर आणि 205 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल व ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये येते.
जबरदस्त इंटिरियर
डार्क एडिशनमध्ये काय वेगळं आहे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या मॉडेल्सना पूर्णपणे ब्लॅक एक्स्टीरियर दिला गेला आहे. मात्र Tata Motors प्रमाणे क्रोम डिटेलिंग काढून टाकण्यात आलेले नाही. इंटिरियरमध्ये पूर्णपणे काळा लेदर इंटिरियर देण्यात आला असून, डॅशबोर्ड, स्टीअरिंग व्हील आणि सीट्स यामध्ये ब्लॅक थीम आहे. विशेष म्हणजे, लाल रंगाची स्टिचिंग दिली गेली असून ती एक प्रीमियम लुक देते. याशिवाय अँबियंट लाइटिंग, फूटवेल लाइट्स आणि इल्युमिनेटेड सिल प्लेट्स यांसारखी नवीन फीचर्सही देण्यात आली आहेत.
हे डार्क एडिशन मॉडेल्स बाजारात आधीपासूनच असलेल्या गाड्यांशी फिचर्सच्या बाबतीत सारखीच आहेत, पण त्यांचा लूक आणि खास इंटिरियर ग्राहकांना आकर्षित करण्याची क्षमता नक्कीच बाळगतो. त्यामुळे आगामी काळात हे मॉडेल्स Hyundai Creta सारख्या हिट SUV ना टक्कर देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.