₹13,499 मध्ये ‘फौजी’ ताकदीचा वॉटरप्रूफ 5G फोन! एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा; जाणून घ्या iQOO Z10x 5G चे फीचर्स

iQOO Z10x 5G हा फोन 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, डायमेन्सिटी 7300 चिपसेटसह लॉन्च झाला आहे. फक्त 13,499 रुपयांपासून त्याची किंमत सुरू होते. हा फोन दमदार फीचर्ससह मिलिटरी ग्रेड गुणवत्ता देतो.

Published on -

iQOO Z10x 5G | iQOO ने आपल्या लोकप्रिय Z सीरिजमधील एक नवीन स्मार्टफोन iQOO Z10x 5G भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन गेल्या वर्षी आलेल्या Z9x 5G चा अपडेटेड व्हर्जन आहे आणि यात अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या फोनची किंमत अत्यंत वाजवी असून, ₹13,499 पासून सुरू होते. यामुळे हा फोन 6500mAh बॅटरीसह मिळणारा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरतो.

फीचर्स-

या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे, जो त्याच्या सेगमेंटमध्ये एक वेगवान चिपसेट मानला जातो. याशिवाय, 6.72 इंचाचा Full HD+ 120Hz रिफ्रेश रेट असलेला LCD डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेवर पंच होल डिझाईनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे, तर मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर दिले आहेत.

iQOO Z10x 5G तीन वेगवेगळ्या स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – 6GB RAM + 128GB स्टोरेज ₹13,499, 8GB RAM + 128GB ₹14,999 आणि 8GB RAM + 256GB ₹16,499. या सर्व प्रकार अल्ट्रामरीन आणि टायटॅनियम या दोन रंगांमध्ये मिळतील. फोन Amazon.in आणि iQOO India eStore वर 22 एप्रिलपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. निवडक क्रेडिट/डेबिट कार्ड्स आणि EMI वर ₹1000 ची सवलत देखील मिळू शकते.

सॉफ्टवेअर-

सॉफ्टवेअरच्या बाबतीत, हा फोन Android बेस्ड Funtouch OS 15 वर चालतो. कंपनीने 2 वर्षांचे Android अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे आणि 6500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी मागील मॉडेलच्या 6000mAh बॅटरीपेक्षा अधिक टिकाऊ आहे.

या फोनला IP64 रेटिंग मिळाले असून तो पाणी आणि धूळपासून सुरक्षित आहे. शिवाय, याला अमेरिकन मिलिटरी-ग्रेड MIL-STD-810H सर्टिफिकेशनही मिळाले आहे, ज्यामुळे त्याची मजबुती आणि टिकाऊपणा सिद्ध होतो.

iQOO Z10x 5G अशा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे, जे स्वस्तात पॉवरफुल परफॉर्मन्स, दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधत आहेत. बाजारात या किंमतीत अशा वैशिष्ट्यांसह दुसरा पर्याय शोधणं अवघडच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News