अहिल्यानगरसहित महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेस्थानकांचे होणार आधुनिकीकरण ! तुमच्या शहरातील रेल्वे स्थानकाचा समावेश आहे का ? वाचा सविस्तर

केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजना राबवली जात असून या अंतर्गत देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून देशभरातील हजारो रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील तब्बल 132 रेल्वे स्थानकाचा विकास करणे प्रस्तावित आहे.

Published on -

Maharashtra Railway News : केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी देशातील अनेक अनेक राज्यांमध्ये नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे फारच मोठे आहे. तरीही देशातील जे भाग अजून रेल्वेने जोडले गेलेले नाही ते भाग रेल्वेच्या नकाशावर यावेत यासाठी रेल्वे कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि सरकार सुद्धा यासाठी प्रयत्नशील आहे.

दरम्यान रेल्वे स्थानकांचा विकास व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात असून राज्यातील जवळपास 132 रेल्वे स्थानकांचा या योजनेच्या माध्यमातून कायापलट होताना आपल्याला दिसणार आहे.

या योजनेतून राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार असून यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास फारच आरामदायी होईल अशी आशा आहे. या सोयी सुविधांमुळे रेल्वेचा प्रवास सुद्धा प्रवाशांना हवाहवासा आणि अगदीच आनंद देणारा ठरणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे मंत्रालयातर्फे ‘अमृत भारत स्टेशन’ योजना राबविली जात आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत देशभरातील एकूण 1,309 रेल्वे स्थानकांचा आधुनिक पद्धतीने पुनर्विकास केला जाणार आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील 132 रेल्वे स्थानक या योजनेअंतर्गत विकसित होणार आहेत. अहिल्यानगर रेल्वे स्थानकाचा देखील या योजनेच्या माध्यमातून कायापालट होणार आहे. या योजनेअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील अनेक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणे प्रस्तावित आहे.

दरम्यान आज आपण उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर धुळे जळगाव नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे आणि यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या रेल्वे स्थानकांचा विकास होणार

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या रेल्वे प्रवासात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला करणे या हेतूने अमृत भारत स्टेशन योजना राबवली जात असून या अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास करणे प्रस्तावित आहेत.

नाशिक जिल्हा बाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील सात स्थानकांचा या योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. या योजनेतुन समाविष्ट असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या दीर्घकालीन गरजा आणि तेथील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन एक मास्टर प्लॅन तयार होणार आहे.

त्यानंतर मग योजनेतील समाविष्ट रेल्वे स्थानकांच्या कामांचा एक आराखडा तयार होईल आणि त्यानंतर मग स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, लासलगाव, मनमाड, नगरसूल, नांदगाव स्थानकांचा या योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोणत्या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी किती निधी?

या योजनेअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून यासाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धुळे रेल्वे स्थानकाचा 9.5 कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास होणार आहे.

लासलगाव रेल्वे स्थानकासाठी 10.5 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, मनमाड रेल्वे स्थानकाबाबत बोलायचं झालं तर मनमाड रेल्वे स्थानकासाठी शासनाच्या माध्यमातून 45 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

नगरसुल रेल्वे स्थानकाबाबत बोलायचं झालं तर या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी शासनाच्या माध्यमातून 20.3 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दुसरीकडे नांदगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी वीस कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 35 कोटी रुपये, अंमळनेर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासासाठी 29 कोटी रुपये, धरणगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 26 कोटी रुपये, पाचोरा जंक्शन रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासासाठी 28 कोटी, देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 10.5 कोटी रुपये आणि इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी साडेबारा कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News