अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…

नवीन उन्नत मेट्रो मार्गिका मेट्रो-2 ब ज्याला पिवळी मार्गिका सुद्धा म्हणतात ती आता मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान आता आपण ही चाचणी नेमकी कशी राहणार? हा रूट कसा असेल? याच बाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या 30 तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान या अक्षय तृतीयेच्या सणाच्या आधीच मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईकरांना एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे.

जवळपास अडीच वर्षांनी मुंबईकरांसाठी हा नवा मेट्रो मार्ग सुरू केला जाणार असून यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका होणार असल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन उन्नत मेट्रो मार्गिका मेट्रो-2 ब ज्याला पिवळी मार्गिका सुद्धा म्हणतात ती आता मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

यामुळे मुंबईकरांचा प्रवास ऐन उन्हाळ्यात गारेगार होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या मार्गिकेतील गाडीची पहिली चाचणी लवकरच पूर्ण होणार आहे. 16 एप्रिल 2025 रोजी ही चाचणी सुरु केली जाणार आहे.

या मेट्रो मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केले जात आहे. दरम्यान आता आपण ही चाचणी नेमकी कशी राहणार? हा रूट कसा असेल? याच बाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असेल रूट?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये सध्या मेट्रो धावत आहे. ठाण्याला देखील लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे. राज्यातील इतरही अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आगामी काळात मेट्रो धावताना दिसणार आहे.

मेट्रो मार्गामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होत आहे यात शंकाच नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्याने तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली असून यामुळे नागरिकांना एक सक्षम वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

यामुळे मुंबई पुण्यात मेट्रोला चांगला भरभरून असा प्रतिसाद मिळतोय. हेच कारण आहे की आता मुंबई आणि पुण्याच्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण केले जात आहे. असे सगळे परिस्थिती असतानाच आता मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज हाती आली आहे आणि ती म्हणजे मेट्रो 2 ब लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.

खरेतर, या मार्गिकेसाठी सहा डब्यांची अत्याधुनिक पद्धतीची गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता ही गाडी या मार्गांवर अपेक्षित असलेला वेग घेते का ? त्यासाठी आवश्यक तितका वीजपुरवठा होतो का ? तसेच गाडीशी निगडित सर्व प्रणाली व्यवस्थित कार्य करीत आहेत का ? याचीच तपासणी या चाचणीदरम्यान केली जाणार आहे.

ही चाचणी उद्यापासून अर्थातच 16 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे या चाचणी कडे मुंबईकरांचे विशेष लक्ष राहणार आहे. ही चाचणी यशस्वी होते की नाही हे खास पाहण्यासारखे राहणार आहे. मेट्रोचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो-2 ब चा डेपो मंडाळा येथे आहे आणि तिथेच याचे पहिले स्थानक सुद्धा आहे.

आता त्यानुसारच ही चाचणी मंडाळा डेपो ते चेंबूर येथील डायमंड गार्डन दरम्यान पार पडेल. या पाच स्थानकांदरम्यान ताशी 80 किमीच्या वेगाने या गाडीची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएने केंद्र सरकारी भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड म्हणजे बीईएमएलकडून मेट्रोचे डबे खरेदी केलेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News