Hapus Mango New Rate : महाराष्ट्रात साधारणता गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. यानुसार आता राज्यातील विविध शहरांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. गुढीपाडव्याला आंब्याला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सगळीकडेच आंब्याला मोठी मागणी असते.
यामुळे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या रेटमध्ये मोठी वाढ झाली होती. पण त्यानंतर आंब्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण झाली आहे. यामध्ये हापूस आंब्याचे रेट सुद्धा लक्षणीय कमी झाले आहेत.

खरंतर गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळाला होता, त्यादिवशी मुंबईच्या बाजारात कोकणातून 79,746 पेट्या तर इतर राज्यांतून 33,160 पेट्यांची आवक झाली होती. मात्र, आता आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या आठवड्यात आंब्याचे दर 300 ते 1200 रुपये प्रति डझन इतके होते, मात्र आता यात बरीच घसरन दिसून येत आहे. सध्या हापूस आंब्याचे दर 200 ते 800 रुपये प्रति डझनपर्यंत खाली आले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की हापूस आंब्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तथापि, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेचा मोठा सण साजरा होणार असून या दिवशी हापूस आंब्याचे दर कसे राहतात ? हे पाहणे विषय उत्सुकतेचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या राजधानी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक अजूनही उल्लेखनीय आहे. येथील मार्केटमध्ये सोमवारी तब्बल 1 लाख 13 हजार पेट्यांतून सुमारे 253 टन आंबा बाजारात दाखल झाला होता.
बाजारांमध्ये मोठी आवक होत असल्याने आता आंब्याचे दर घटले आहेत. साहजिकच रेटमध्ये कपात झाली असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळतोय. दरम्यान, सोमवारी आलेला आंबा या आठवड्याच्या अखेरीस पूर्णपणे पिकून विक्रीसाठी तयार होईल.
त्यामुळे पुढच्या आठवड्यात आंबा आणखी स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. आंब्याची वाढती आवक आणि घसरते दर पाहता, सर्वसामान्य ग्राहकांना आता अधिक परवडणाऱ्या किमतीत हापूस आंब्याचा आनंद घेता येणार आहे.
खरेतर, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले, कारण म्हणजे यावर्षीचे हवामान आंबा पिकासाठी विशेष अनुकूल ठरले. दरम्यान कोकणातील हापूस आंब्याचे विक्रमी उत्पादन अन आता आंब्याची थोडीशी कमी झालेली मागणी या सर्व पार्श्वभूमीवर आंब्याचे दर घसरलेले आहेत. सध्या हापूस आंबा फक्त दोनशे ते आठशे रुपये प्रति डझन या दरात विकला जातोय.