Google Pixel 9 Offer : तुम्हाला एक प्रीमियम लुकिंग स्मार्टफोन खरेदी करायचाय का ? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे ! होय आज आमही तुम्हाला गुगलच्या Pixel 9 बद्दल माहिती सांगणार आहोंत. हा स्मार्टफोन हाय क्वालिटी फीचर्ससह येतो आणि त्याच्या परफॉर्मन्समुळे तो अनेक युजर्ससाठी पसंतीचा पर्याय ठरतो आहे. हा फोन हातात धरायला आणि वापरायला खूपच आरामदायक वाटतो.
Google Pixel 9 ची ऑफर
Google Pixel 9 चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट Amazon वर सध्या 74,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन लॉन्चवेळी 79,999 रुपयांना बाजारात आणण्यात आला होता. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास युजर्सना 7,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. अशा स्थितीत फोनची अंतिम किंमत 67,999 रुपये होते. याचा अर्थ असा की, सध्याच्या ऑफरनुसार ग्राहकांना हा फ्लॅगशिप स्मार्टफोन तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त मिळतो आहे.

डिस्प्ले आणि डिझाइन
Pixel 9 मध्ये 6.3 इंचांची Actua OLED डिस्प्ले देण्यात आली आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x 2424 पिक्सेल असून यामध्ये 422ppi पिक्सेल डेंसिटी आणि 2700 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz ते 120Hz पर्यंत आहे, त्यामुळे स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन खूपच स्मूथ अनुभवता येते. स्क्रीनवर गोरिल्ला ग्लास विक्टस 2 चे संरक्षण असून यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
हा स्मार्टफोन Google च्या Tensor G4 चिपसेटसह येतो. ही चिप अॅडव्हान्स्ड AI कार्यक्षमतेसह येते आणि ती डिव्हाइसच्या परफॉर्मन्समध्ये मोठा फरक निर्माण करते. Pixel 9 Android 14 वर चालतो, त्यामुळे युजर्सना नवीनतम सॉफ्टवेअर फीचर्स आणि सुरक्षा अपडेट्सचा लाभ मिळतो. हे डिव्हाइस IP68 रेटिंगसह येते, ज्यामुळे ते पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित असते.
कनेक्टिव्हिटी
Pixel 9 मध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, GPS, ड्युअल बँड GNSS आणि USB Type-C सारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत. त्यामुळे डिव्हाइसचे नेटवर्किंग आणि डेटा ट्रान्सफर अत्यंत जलद आणि विश्वसनीय असते. हा फोन वापरताना कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हिटीची अडचण जाणवत नाही.
कॅमेरा सेटअप
Pixel 9 मध्ये 50MP चा ऑक्टा PD वाइड अँगल कॅमेरा दिला आहे, जो 8x Super Res Zoom सह येतो. यासोबत 48MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देखील दिला आहे, ज्यामध्ये 1/2.55 इंचाचा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 10.5MP चा ड्युअल PD फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Google चे सॉफ्टवेअर बेस्ड इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञान या कॅमेरा सेटअपला अत्यंत परिणामकारक बनवते, जे प्रोफेशनल लेव्हल फोटोग्राफीचा अनुभव देते.
बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट
Pixel 9 मध्ये 4,700mAh क्षमतेची बॅटरी दिली असून, ही बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला आणि Qi-सर्टिफाइड वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे फोनला जलद चार्ज करता येते आणि बॅटरी आयुष्यही चांगले मिळते. दिवसभराचा बॅकअप सहज मिळतो.