Motorola Edge 60 Stylus भारतात लॉन्च ! स्टायलस आणि प्रचंड फीचर्स, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

खरेदीदरम्यान ग्राहकांना काही लाँच ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. Flipkart वरून खरेदी करताना 1,000 रुपयांची एक्सचेंज सूट मिळू शकते. Axis आणि IDFC बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना संपूर्ण पेमेंटवर 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळते. रिलायन्स जिओ वापरकर्त्यांसाठी 8,000 रुपयांपर्यंतचे फायदे आणि 2,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक उपलब्ध आहे.

Published on -

मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus भारतात लाँच केला आहे. यामध्ये सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणारा बिल्ट-इन स्टायलस, जो वापरकर्त्यांना सर्जनशीलतेसाठी आणि प्रोडक्टिव्ह टास्कसाठी वेगळा अनुभव देतो. हा स्मार्टफोन मध्यम किंमत विभागात सादर करण्यात आला असून, दमदार प्रोसेसर, मोठा डिस्प्ले, आणि AI बेस्ड कॅमेरा सेटअप यामुळे युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरतो आहे.

Motorola Edge 60 Stylus ची भारतातील किंमत

Motorola Edge 60 Stylus फक्त एकाच प्रकारात लाँच करण्यात आला आहे – 8GB RAM आणि 256GB स्टोरेज. या मॉडेलची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – Pantone Gibraltar Sea आणि Pantone Surf the Web. 23 एप्रिलपासून Motorola India च्या वेबसाइटवर, Flipkart वर आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

डिस्प्ले आणि डिझाइन

Edge 60 Stylus मध्ये 6.67 इंचांचा 1.5K pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1220 x 2712 पिक्सेल असून, याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे. ‘Aqua Touch’ नावाचे तंत्रज्ञान यामध्ये समाविष्ट आहे, जे ओल्या बोटांनीही उत्तम टच प्रतिसाद देते. डिस्प्लेला Gorilla Glass 3 चे संरक्षण असून SGS लो ब्लू लाईट व मोशन ब्लर रिडक्शन सर्टिफिकेशन मिळाले आहे.

प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यामध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. Motorola Edge 60 Stylus Android 15-आधारित Hello UI वर चालतो आणि कंपनीने याला दोन वर्षांसाठी OS अपडेट आणि तीन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

कॅमेरा फीचर्स

Motorola Edge 60 Stylus च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP चा Sony LYTIA 700C प्रायमरी सेन्सर, 13MP अल्ट्रावाइड शूटर, आणि एक समर्पित 3-in-1 लाईट सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे AI-सक्षम कॅमेरे उत्तम पोर्ट्रेट्स, नाईट मोड, आणि HDR इमेजिंगचा अनुभव देतात.

बॅटरी आणि चार्जिंग आणि इतर फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे जी 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फोन कमी वेळात फुल चार्ज होतो आणि दीर्घकाळ टिकतो. बिल्ट-इन स्टायलससाठी एक खास स्लॉट फोनच्या खालच्या भागात देण्यात आला आहे, ज्यात AI-सहाय्यक स्टायलस फीचर्सचा लाभ घेता येतो.फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह Dolby Atmos सपोर्ट आहे, जे प्रीमियम ऑडिओ अनुभव देतात. या डिव्हाइसला MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणाचे प्रमाणपत्र आणि IP68 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe