अक्षय तृतीयेच्या आधीच मुंबईकरांसाठी Good News ! ‘या’ शहरापर्यंत धावणार ताशी 160 किमी वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस

सध्या राजधानी मुंबईवरून सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर सुरू असणारी वंदे भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे कारण की भारतीय रेल्वे अहमदाबाद–मुंबई मार्गावर ट्रेनचा वेग 130 किमी/तासाहून 160 किमी/तासापर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे.

Published on -

Vande Bharat Express News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबईवरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. खरे तर सध्या राजधानी मुंबईवरून सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते साईनगर शिर्डी सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गांवर सध्या वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

याव्यतिरिक्त इतर पाच महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे यापैकी तीन गाड्या नागपूरला आणि दोन गाड्या पुण्याला मिळालेल्या आहेत. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस चा वेग 160 किलोमीटर प्रतितास इतका आहे मात्र अजूनही ही गाडी तिच्या पूर्ण क्षमतेने धावत नाही.

पण आता देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी पूर्ण क्षमतेने धावताना दिसू शकते. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर सुरू असणारी वंदे भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे कारण की भारतीय रेल्वे अहमदाबाद–मुंबई मार्गावर ट्रेनचा वेग 130 किमी/तासाहून 160 किमी/तासापर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेची पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याचे काम वेगाने सुरू असून, दिल्ली–हावडा (1,450 किमी) आणि दिल्ली–मुंबई (1,386 किमी) मार्गांवरही गती वाढवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरण्म्यान, या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 3,950 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई–अहमदाबाद (595 किमी) मार्गावर जनावरांपासून होणारे अपघात टाळण्यासाठी ₹226 कोटींच्या खर्चाने कुंपण घालण्यात येत आहे. तसेच 160 किमी/तास वेगासाठी 126 पुलांच्या approaches Geo Cells वापरून मजबूत करण्यात आल्या आहेत.

दिल्ली–मुंबई मार्गावर 160 किमी/तास गतीसाठी सर्वेक्षण आणि कामे प्रगत टप्प्यात आहेत. या मार्गावर 196 किमीवर आधीच चार मार्गिका कार्यरत असून, डहाणू रोड–विरार दरम्यान (64 किमी) तिसरी आणि चौथी मार्गिका बांधली जात आहे. उर्वरित 1,126 किमीसाठीही सर्वेक्षणास मान्यता मिळाली आहे.

गुजरातमध्ये 2014-24 या काळात 165 रोड ओव्हरब्रिज, 779 अंडरब्रिज, 1,264 मानवविरहित फाटे आणि 614 फाटे बंद करण्यात आले असून, 4,640 किमी ब्रॉडगेज मार्ग 100% पूर्ण झाला आहे. नक्कीच या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच जलद होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News